HomeValentine Day Valentines day Marathi Story Katha sms Advertisement खुप प्रेम करतो ग तुझ्यावर व्हेलेँटाईन डे येताच गणेश च्या चेहऱ्यावर एक वेगळच स्मीत हास्य दिसून यायचं.. . एका मंदिराच्या शेजारी असलेल्या दुकानावर काम करणारा हा गणेश.. . ह्या वेळेस पण खुप सारी गुलाबाची फुले विकत घेऊन आला.. . गणेश ला माहिती नव्हतं कि व्हेलेँटाईन डे काय असतो? . पण त्याला हे माहीत होतं आजच्या दिवशी दहा रुपयाला विकले जाणारे गुलाब ५० रुपयाला विकले जाते.. . तो सकाळ पासून धावपळ करत होता.. त्याला वाटलं आज चांगली कमाई होणार.. त्याचे दोन-तीन तासात सगळी फुल विकली गेली... . त्याने पटकन पैसे मोजले आणि त्या पैशातून ५०० रुपये बाजूला ठेवले.. . तो त्याच्या मालकाकडे गेला आणि त्याची असलेली उधारी त्याने देऊन टाकली . आणि पळत पळत बाजारात जाऊन गोखले काकांच्या दुकानावर गेला.. . गोखले काका-अरे गणेश आज खुप लवकर आलास? . गणेश-काका आज १४ फ्रेब्रुवारी आहे ना.. . गोखले काका-हो मी तर विसलोच होतो.. . बोल काय पाहिजे तुला?? . गणेश-ती हिरव्या रंगाची फ्राँक दाखवा ना... . गोखले काका-अरे महाग आहे तु घेशील का? ४८० रुपयांची आहे.. . गणेशने विचार केला आणि म्हणाला.. काका करा पैक.. आता त्याच्याकडे २० रु राहिले तो काकांना म्हणाला, काका २० रुपयांची डेरी मिल्क पैक करा.. . गणेशने ५०० रु काकाला देऊन आपल्या घराकडे वाट गाठली.. . . घरी गेल्यावर आईल म्हणाला.. . आई.. आई.. छोटी कुठेय?? . आई-आत मध्ये बसलीय.. . . गणेश छोटी जवळ गेला आणि तिला मिठी मारुन म्हणाला.. . हैप्पी व्हेलेँटाईन डे...!! . . . विचारा विचारांचा फरक आहे. प्रेम तर प्रेम असतं..!! www.marathisms.blogspot.com More sms jokes Click here valentines day quotes status image whatsapp status lines Short text girlfriend boyfriend gf bf love romance romantic night gift idea kiss sweet heart touching best new fresh latest Advertisement Tags: Valentine Day Facebook Twitter