SMS Category
Home
अविश्वसनीय ...अकल्पनीय!
लग्न लागले .. दोघेही खुशीत होते .. स्टेज वर फोटो सेशन चालू होते ... वराने आपल्या मित्रांची तिथे उभ्या असलेल्या आपल्या त्याच्या मेहुणी शी पुरुषी अहंकारात ओळख करून दिली .. " ही माझी साली, अर्धी घरवाली" मित्र मनसोक्त हसले .. मेहुणी खाली बघून नाटकी हसली.. वधुही हसली आणि पुढच्याच क्षणी... आपल्या दिराचा परिचय आपल्या मैत्रीनिंशी करून दिला .. " हे माझे दीर ..अर्धे पति परमेश्वर ? अकस्मात विज कोसळली ... स्तब्धता ... अविश्वसनीय ...अकल्पनीय! दिराचे तोंड काळवन्डले नवरा तर जवळ जवळ बेशुद्ध च झाला होता ... वर्हाडी , वराचे मित्र कलवरे ,नातेवाईक सहित सगळ्याच्या चेहर्या वरचे हसू मिटले ... सुतकी चेहर्याने सर्व इकडे तिकडे बघू लागले.. झाले ... लक्ष्मण रेखा लुप्त झाली .. स्री हि पुरुषी साखळदंड तोडून मुक्त झाली... स्त्री मर्यादा नावाची प्रकाशज्योत विझली .. थोड्याच वेळात (अफवेच्या ) रस्त्यावर एम्बुलेंस लाल सायरन वाजवत शहरात फिरू लागली .. ज्यात दोन स्ट्रेचेर होते .. एक स्ट्रेचर वर भारतीय संस्कृति बेशुद्ध पडली होती ... कदाचित हृदयविकाराचा झटका असावा .. दुसरया स्ट्रेचर वर पुरुषवाद जखमी होउन पडला होता ... कुणी तरी त्याच्यावर जबरदस्त आघात केला होता ... कलियुगी स्री वर्गाने मारलेली चपराक दंभी पुरुषी अहंकाराला भानावर आणण्या साठी पुरेशी ठरली ..!! हे व्यंग ख़ास पुरुष वर्चस्व गटा साठी जे महिलांवर अश्लील कोट्या तर करतात पण ज्यावेळी स्री वर्गाची वेळ येते तेव्हा संस्कृति लोप पावल्याची वल्गना करतात ..!! खरी संस्कृती जोपसना दोन्ही वर्गा कडून (स्री-पुरुष) परस्पर आदरभावात अन परस्परांच्या मर्यादेतच आहे ..! www.marathisms.blogspot.com
Social sms
Related Posts
पैसे नसतात तेव्हा माणूस..
Rain sms jokes vinod
Navra kasa asava poem kavita
World population day essay speech i...