SMS Category
Home
Great Message Status
एक अतिश्रीमंत पिता आपल्या मुलाला एका खेड्यात घेऊन गेला.. लोक किती गरिबीत जीवन जगतात हे मुलाला दाखवण्याचा त्याचा उद्देश होता. एका गरीब कुटुंबात शेतातील घरात दोन दिवस ते राहिले. आपल्या घरी परततांना त्यने मुलाला विचारले... , . ' कशी झाली ट्रिप ? ' ' फारच छान डॅड ' ' गरीब लोक कसं जीवन जगतात बघितलंस ना? ' ' हो ' मुलगा म्हणाला. . ' हं आता मला सांग हे बघितल्यानंतर तू काय शिकलास ?' वडीलांनी विचारलं.. . मुलगा म्हणाला '' मी बघितलं आपल्याजवळ एक कुत्रा आहे तर त्यांच्याजवळ चार .'' . आपल्या बागेच्या मध्यभागी एक तळं आहे तर त्यांच्याजवळ खाडी आहे की जिला अंत नाही. . आपल्या बागेत इंपोर्टेड दिवे आहेत तर त्यांच्याजवळ रात्रभर लुकलुकणारे तारे आहेत. . आपल्या बागेची सीमा कुंपणापर्यंत संपते त्यांच्यासाठी तर अवघं आकाश खुलं आहे. . राहण्यासाठी आपल्याकडे जमिनीचा लहानसा तुकडा आहे. तर नजर पोहोचणार नाही तिथपर्यंत त्यांची शेतं आहेत. . आपल्याकडे नोकर आहेत आपली सेवा करण्यासाठी आणि ते दुसर्यांची सेवा करतात. . आपले अन्न आपण विकत घेतो आणि ते स्वत: चं अन्न स्वत: पिकवतात. . संपत्तीचं रक्षण करण्यासाठी त्याभोवती आपण कुंपण बांधले आहे. रक्षणासाठी त्यांचे मित्र धावून येतात. . वडील स्तब्ध झाले. मुलगा पुढे म्हणाला , '' आपण किती गरिब आहोत ते मला दाखवल्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे. पाहण्याचा दृष्टीकोन ही अजब गोष्ट आहे की नाही...? . आपल्याजवळ जे नाही त्याचे दु:ख करण्यापेक्षा जे आहे त्याबद्दल परमेश्वराचे आभार माना....
Social sms
Related Posts
Rain sms jokes vinod
Navra kasa asava poem kavita
World population day essay speech i...
Relation sms in marathi नाती kavita