SMS Category
Home
sad prem kavita marathi
जिवंतपणे मला मारुनी गेली... प्रेमाचे ते शब्द गुंफता गुंफता शब्दांना त्या अर्थहीन करुनी गेली... प्रेमाची प्रीत गाता गाता तू प्रीत ती अबोल करुनी गेली... उघड्या डोळ्यांनी स्वप्ने पाहताना डोळ्यांना अश्रूत बुडवुनी गेली... नव्या दिवसाची वाट पाहत असताना काळाला तिथेच थांबवूनी गेली... आशेचा किरण जीवनात पाहताना जीवनच अंधारमय करुनी गेली... सात जन्माचे वचन देता देता पहिलेच वचन तोडूनी गेली... चंद्रात तुझा चेहरा पाहत असताना अमावस्या आकाशी करुनी गेली... सुखाची कुठे चाहूल लागत असताना दुखाचे वार मजवरी करुनी गेली... परतफेड माझ्या प्रेमाची करुनी तू जिवंतपणे मला मारुनी गेली...जिवंतपणे मला मारुनी गेली... www.marathisms.blogspot.com
Sad
Related Posts
sad messages in marathi
prem dukhi kavita
sad marathi sms love