Home Sex Life Marathi sex life power increase Sex Life Marathi sex life power increase By atish April 27, 2015 0 Comments फावल्या वेळेत केलं जाणारं बागकाम मनाला प्रसन्न ठेवत असलं तरी त्यामागचं इंगित खरं वेगळंच आहे. नियमित gardaning बागकाम केल्यास सेक्स लाईफ खुलतं आणि त्यामुळे मन प्रसन्न, आनंदी रहातं, असा निष्कर्ष व्हिएन्नातील वैद्यकिय विद्यापीठाने काढला आहे. हे निष्कर्ष युरोपियन युरॉलॉजी जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. आठवड्यात किमान अर्धा तास जरी बागकाम केलं तरी त्यामुळे बेडरूममधील 'काम'गिरी खुलते असे या संशोधकांचे म्हणणे आहे. बागकामातील खणणे, रोपटी उपटणे, रोपांची कापणी करणे या कामांत आठवड्यात अर्धा तास घालवला तरी त्यामुळे सेक्समध्ये मजा येते. अनेकदा जोडीदाराच्या अपेक्षांची पूर्ती करण्यात आपण कमी पडतो. पण बागकामामुळे असे होण्याची भीती एक तृतीअंशाने कमी होते. याशिवाय जेवढा जास्त काळ बागेत घालवाल त्याच्या निम्म्याने सेक्समधील नीरसता कमी होते. नियमित शारीरिक हालचाल कामप्रवृत्ती जागृत ठेवण्याचे काम करते. त्यामुळे सेक्समधील आपली अनास्था कमी होते. आठवड्यात एक हजार कॅलरीज खर्च होणे सेक्समधला आनंद टिकविण्यासाठी पुरेशा असतात. सेक्समध्ये आनंद मिळाला की सहाजिकच रोजच्या जगण्यातही तो परावर्तित होतो. म्हणूनच डॉक्टरांनी आता आपल्या रूग्णांना बागकाम करण्याचा सल्ला दिला पाहिजे, असे मत या संशोधनात व्यक्त करण्यात आले आहे. आठवड्यात तीस ते 45 मिनिटे बागकाम करून हजार कॅलरी जाळणे हे अर्धा तास नृत्य करणे, 15 मिनिटे सायकलिंग करणे आणि 1.5 किलोमीटर जॉगिंग करण्यासारखेच असते, असे या संशोधकांचे मत आहे. यामुळे देखिल सेक्समधील नीरसता 38 टक्क्यांनी कमी होते. www.marathisms.blogspot.com Sex Life