SMS Category
Home
ब्रिटिश महिलेसमोर हस्तमैथुन Are women safe in india ?
पर्यटनासाठी भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांना काही विकृत लोकांच्या अश्लील चाळ्यांना कसे तोंड द्यावे लागते, याचा लाजिरवाणा अनुभव एका ब्रिटिश महिलेने तिच्या ब्लॉगवर शेअर केला आहे. ब्लॉगवर हा अनुभव व्हायरल होताच खजिल झालेल्या ब्रिटनमधील भारतीयांनी संबंधित महिलेला मोठ्या संख्येनं मेसेज पाठवून तिची जाहीर माफी मागितली आहे. 'माइल्स अवे ट्रॅव्हल्स' या ब्लॉगमध्ये ब्रिटनच्या लुसी हेमिंग्ज या तरुणीनं तिच्यावर गुदरलेला हा प्रसंग शब्दबद्ध केलाय. त्याचं झालं असं, लुसी ही तीन महिन्यांच्या पर्यटनासाठी भारतात आली होती. पर्यटनादरम्यान मुंबईत ती एका बस स्टॉपवर बसली असताना एक पुरुष तिच्या दिशेनं येत असल्याचं तिनं पाहिलं. तिचं लक्ष त्याच्याकडं जाताच तो माणूस तिथंच थांबला व तिच्यापासून काही अंतरावर उभा राहिला. तो दूर उभा राहिल्यानं तरुणी रिलॅक्स झाली. काही वेळानं हळूच तिरक्या नजरेनं तिनं त्याच्याकडं पाहिलं आणि तिला धक्काच बसला. तो पुरुष चक्क हस्तमैथुन करत होता. हे पाहून ती काहीवेळ सुन्नच झाली; पण दुसऱ्याच क्षणी स्वत:ला सावरत तिनं तिथून काढता पाय घेतला. लंडनहून प्रकाशित होणाऱ्या 'इंडिपेंडंट' या वृत्तपत्राने लुसीचा हा अनुभव प्रसिद्ध केला आहे. लुसीला मुंबईत एकदा नव्हे, तर दोनदा अशा अश्लील वर्तनाचा सामना करावा लागला. लोकलची वाट बघत असतानाही असाच प्रकार अनुभवास आला. लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या अन्य एका प्रवाशांच्या निदर्शनास हा प्रकार आणल्यानंतर ती विकृत व्यक्ती पळून गेली, असं लुसीनं म्हटलंय. 'या अश्लील प्रकारांमुळे मी निराश झाले. कुठल्याही अनोळखी व्यक्तीकडे बघण्याची मला हिंमतच होत नव्हती. त्या घटनेनंतर दोन-तीन दिवस मी पूर्णपणे अस्वस्थ होते. अनोळखी व्यक्तींना मी सर्रास टाळत होते. मला खूपच मानसिक त्रास झाला,' असं लुसीनं म्हटलं आहे. www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
Social sms
Related Posts
Relation sms in marathi नाती kavita
पैसे नसतात तेव्हा माणूस..
Rain sms jokes vinod
Navra kasa asava poem kavita