SMS Category
Home
Mahatma Phule Smrutidin sms message status
महात्मा जोतीबा फुले (एप्रिल ११, इ.स. १८२७ - नोव्हेंबर २८, इ.स. १८९०) हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन पुरोगामी विचारांची मांडणी केली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणास प्रोत्साहन देऊन मुहुर्तमेढ रोवली. त्यांनी भारतातील मुलींची पहिली शाळा १८४८ साली पुणे येथे भिडेंच्या वाड्यात उघडली. आपल्या पुरोगामी विचारांची निर्भयपणे मांडणी केली व स्वत:चे विचार आचरणात आणले.महात्मा ज्योतीराव फुले यांनी आपले व्यक्तिमत्व स्वयंप्रेरणेने व स्वतःच्या प्रयत्नांनी घडविले होते. त्यांचा पिंड हा कृतीशील क्रांतिकारकाचा होता.महाराष्ट्राच्या समाजसेवेसाठी ध्येयाने भरून जाऊन आपले सर्व जीवन समर्पित करणारे ते थोर पुरुष होते.आधुनिक भारतातले पहिले समाजक्रांतिकारक म्हणून त्यांना ओळखले जात असत.कारण ते सामन्यातील असले तरी विचाराने व कर्तुत्वाने असामान्य होते.सामाजिक विषमतेविरुद्ध ज्योतीबांनी बंड पुकारले. 'शिक्षण व समता' या दोन शब्दातच त्यांच्या या कार्याचे यथोचित वर्णन करता येईल.महाराष्ट्रातील सर्वसामान्यांसाठी रात्रंदिवस झटणारे ते सेवक होते. अशा या क्रांतीसुर्यास विनम्र आदरांजली www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
information details essay nibandh
Mahatma Jyotirao Phule
Related Posts
Happy Mahatma Jyotiba Phule Jayanti...
Mahatma phule Jayanti message in Ma...
Mahatma Phule Jayanti sms messgae i...
Mahatma Phule speech biography info...