SMS Category
Home
athavan prem kavita poem for boyfriend
आता तु नाहीस म्हणून काय झाले.. आता तु नाहीस म्हणून काय झाले, तु दिलेल्या आठवणी तरी आहेत.. तुझ्या बरोबर राहीलेल्या, प्रत्येक क्षणाच्या जाणिवा तरी आहेत.. आता तु नाहीस म्हणून काय झाले, तुझा हसरा चेहरा सदैव मनात आहे.. तुझ्या अस्तित्वाच्या सावल्यांच्या, पाऊलखुणा तरी आहेत.. आता तु नाहीस म्हणून काय झाले, तुझ्याबरोबर पाहिलेली स्वप्नं तरी आहेत, त्याचं स्वप्नांच्या नगरात जायची माझी वाट तरी मोकळी आहे.. आता तु नाहीस म्हणून काय झाले, तुझ्याकडून मिळालेली प्रेरणा तरी आहे.. याचं प्रेरणेच्या जोरावर, आज मी उंच भरारी घेत आहे.. आता तु नाहीस म्हणून काय झाले, तुझा शब्द न् शब्द कानात घुमत आहे.. गर्दीत उभी राहूनही, एकटचं तुझी वाट पाहत आहे. www.marathisms.blogspot.com
Miss U sms
Related Posts
aathavan marathi charolya
athavan quotes in marathi
tuzi aathavan kavita boyfriend priy...
miss you marathi kavita poem