SMS Category
Home
Happy women's day message in marathi
उद्या कदाचित तुमच्या बायकोने हा प्रश्न विचारला तर वाईट वाटुन घेऊ नका. कारण ती काहीच चुकीचं विचारत नाही. विचार करायला लावणारा , ह्रदयाला भिडवणारा....... तिचा फक्त एकच प्रश्न ....... देह माझा , हळद तुझ्या नावाची . हात माझा , मेहंदी तुझ्या नावाची . भांग माझा , सिंदूर तुझ्या नावाचा . माथा माझा , बिंदिया तुझ्या नावाची . नाक माझे , नथ तुझ्या नावाची . गळा माझा , मंगळसूत्र तुझ्या नावाचे . मनगट माझे , (बांगड्या) चुडा तुझ्या नावाच्या . पाय माझे , जोडवी तुझ्या नावाची . आणि हो..... वडीलधा-यांच्या पाया मी पडते , आणि ...... अखंड सौभाग्यवती भव । आशिर्वाद मात्र तुला. वटपौर्णिमेचे व्रत माझे , आयुष्याचे वरदान तुला . घराची काळजी घ्यायची मी, दरवाजावर नावाची प्लेट तुझी. नाव माझे , पण त्यापुढे ऒळख तुझी . इतकच काय ....... ऊदर माझे , रक्त माझे , दूध माझे, आणि मुलं ? मुलं तुझ्या नावाची . माझं सगळच तर, तुझ्या नावाचं...... तक्रार नाही ... प्लिज रागाऊही नकोस, अत्यंत नम्रपणे एक प्रश्न विचारतेय.. एवढच सांग..... तुझ्याकडे काय आहे का रे, माझ्या नावाचं ? आज ८ मार्च जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा www.marathisms.blogspot.com
marathisms.blogspot.com
Women's day
Related Posts
jagtik mahila din shubhechha kavita
women's day speech in marathi langu...
jagtik mahila din marathi sms
women's day information essay in ma...