SMS Category
Home
jagtik mahila din shubhechha kavita
°°°आई-बाबा मित्र मैत्रिणी सोडून आली तुझ्या घरी°°° °°°तिचे मन सांभाळायची आता कोणाची जबाबदारी°°° °°°अनोळख्या कुटुंबात इतकी ती एकरुप होते°°° °°°स्वतःची काही आवड होती हेच मुळी विसरुन जाते°°° °°°अशा तुझ्या पत्नीसाठी थोडासा बदलशील का°°° °°°तिच्या मनाचा थोडातरी विचार जरा करशील का°°° °°°कधी सकाळी लवकर उठून चहा तिला नेऊन दे°°° °°°वाफाळता गरम उपमा हळूच पुढ्यात आणून दे°°° °°°भाजीत मीठ नसले तरी हसून वेळ मारुन ने°°° °°°स्वैपाकाला कधी तरी कौतुकभरले शब्द दे°°° °°°साडी मस्त शोभतीये आज--मनमोकळी दाद दे°°° °°°सुटीत एखाद्या एकटीलाच आपणहून फिरायला ने°°° °°°मुलगीच समजून हट्ट एखादा तूच जरा समजून घे°°° °°°वाढदिवस नसतानाही प्रेझेंटचा धक्का दे°°° °°°वादात स्वर उंचावतातच शांतपणे ऐकून घे°°° °°°पुरुषप्रधान संस्कृती सोडून माणूसपणाला थारा दे°°° °°°झोपताना थोपटून तिला आधाराची कुशी दे°°° °°°जमलेच तर सुरात गुणगुणून स्वप्नांची मोकळीक दे°°° °°°हातात हात घेतलास लग्नात, आता खरी साथ दे°°° °°°नवरेपणा दूर टाकून विसावायला प्रेमळ खांदा दे°°° °°°अशी काहीशी साथ दे°°° °°°मित्रत्वाचा हात दे°°° आज ८ मार्च जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा www.marathisms.blogspot.com
marathisms.blogspot.com
Women's day
Related Posts
Happy women's day message in marath...
women's day speech in marathi langu...
jagtik mahila din marathi sms
women's day information essay in ma...