SMS Category
Home
life marathi quotes katha story
एका माणसाचं निधन होतं हे त्याच्या लक्षात येतं जेव्हा साक्षात भगवंत हातात सूटकेस घेऊन त्याच्या समोर प्रगटतात. भगवंत अाणि त्या माणसामधील संवाद भगवंत - वत्स, चल अाधीच उशिर झालाय ! माणूस - पण देवा मला तर तुम्ही फार लवकर आणलंत. मला आणखी खुप काही करण्याची इच्छा अाहे. भगवंत - माफ कर, अगोदर च फार उशीर झाला आहे. माणूस - पण भगवंता, ह्या सूटकेस मध्ये काय आहे ? भगवंत - जे आहे ते तुझंच आहे ! माणूस - माझं म्हणजे माझ्या वस्तू, कपडे पैसे..... भगवंत - ते काही नाही कारण त्या सर्व भुतलाशी संबंधित आहेत. माणूस - माझ्या आठवणी ? भगवंत - त्या काळाशी संबंधित आहेत. माणूस - माझं क्रतुत्व भगवंत - नाही ते परिस्थितीशी संबंधित आहे. माणूस - माझे मित्र आणि परिवार भगवंत - नाही वत्सा ते तर तुझ्या प्रवासातील सोबती होते माणूस - माझी पत्नी व मुलं भगवंत - ते तर तुझ्या ह्रुद्यात आहेत. माणूस - मग माझं शरीर भगवंत - नाही, नाही ते तर राख झालं माणूस - मग नक्की माझा आत्मा असेल भगवंत - वत्सा तु परत चुकलास तुझा आत्मा तर माझ्याशी संबंधित आहे. माणसाच्या डोळ्यातून अाता अश्रु येऊ लागतात. त्याने भगवंताच्या हातातून सूटकेस घेतली आणि मोठ्या आशेने उघडून बघितली तर काय ....... रिकामी निराश होऊन डोळ्यातील अश्रु पुसत माणूस - म्हणजे माझं स्वता:चं काहीच नाही ? भगवंत - अगदी बरोबर, तुझ्या मालकीच कधीच काही नव्हतं. माणूस - मग त्या सगळ्याचा अर्थ काय ?? जीवन हे क्षणभंगुर आहे. फक्त .... छान जगा प्रेम करा मिळालेल्या जिवनाचा उपभोग घ्या www.marathisms.blogspot.com
Life
Related Posts
good thoughts in marathi about life
jivan kavita in marathi
Ayushya khup sundar aahe kavita
Jivan kavita in marathi