SMS Category
Home
Darsh pithori amavasya sms message shubhechcha दर्श पिठोरी अमावास्या शुभेच्छा
आज दर्श पिठोरी अमावास्या, श्रावण अमावास्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. ( हा सण विशेषतः कोकणामध्ये रायगड -पनवेल परिसरामध्ये साजरा केला जातो) आजच्या दिवशी रानामाधली फुले आणि चड्ड्या ची झाडे आणून त्याची देव म्हणून यथासांग पूजा केली जाते .श्रावण अमावास्येला उपवास करून सायंकाळी सर्वतोभद्रमंडलावर आठ कलशांची प्रतिष्ठापना करतात , त्यावर पूर्णपात्र ठेवून त्यात ब्राम्ही, महेश्वरी, वैष्णवी, वाराही, कोमारी, इंद्राणी, चामुंडा इत्यादी शक्तीदेवतेच्या मूर्तीची पूजा करतात. तांदुळाच्या राशीवर चौसष्ठ सुपाऱ्या मांडून योगिनींचे आवाहन करतात. या चौसष्ठ योगिनी म्हणजे उपजीवेकेसाठी उपयुक्त चौसष्ठ कलाच आहेत. त्याचीच ही प्रतिके आहेत. त्यांचीच पूजा करतात. व्रतात नैवेद्यासाठी पिठाचेच सर्व पदार्थ करतात. म्हणूनच या तिथीला पिठोरी अमावस्या असे म्हणतात. घरी गोड-धोड पंचापक्कावान करतात...सर्वजण एकत्र आनंदामध्ये पंचापक्कावान एकत्रित भोजनाचा आनंद लुटतात.....नंतर त्या देवाची यथासांग विसर्जन करतात.. माझ्या सर्व मित्रांना व त्यांच्या परिवाराला पिठोरी अमावसेच्या मनपूर्वक शुभेच्छा...!!!!!! www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
Darsh pithori amavasya
No similar posts