SMS Category
Home
Raja ram mohan roy information in marathi biography essay nibandh speech राजा राममोहन रॉय
२२ मे १७७२ (१७७४?) रोजी बंगालमधील राधानगर येथे जन्मलेल्या राममोहन यांच्या जडणघडणीत त्यांच्या माता-पित्यांच्या घराण्यांचा संबंध फार मोठा आहे. वडीलांकडील सर्व मंडळी आधुनिक शिक्षण घेतलेली आणि बहुतांश सरकार दरबारी मोठ्या हुद्द्यावर नोकरी करणारी होती. त्यामुळ त्यांच्या वडीलांनी वयाच्या नवव्या वर्षी त्यांना अरबी, फारसी या त्याकाळच्या सरकारात / व्यवहारात वापरल्या जाणार्या भाषा आणि शास्त्र शिकण्यासाठी पाटण्याच्या एका मदरशात (मुक्तब) पाठवल. मदरशामधे अरबी आणि फारसी भाषांबरोबरच त्यांनी इस्लाम धर्म आणि सुफी पंथ, शायर आणि शायरी यांचादेखील अभ्यास केला. हाफीज आणि सादी हे त्यांचे आवडते शायर होते. तिथ शिक्षण घेतल्यानंतर वयाच्या बाराव्या वर्षी आईच्या प्रभावामुळे, ज्यांच्या माहेरची मंडळी प्रामुख्यान पौरोहित्य करणारी होती, धार्मिक शिक्षण घेण्यासाठी म्हणून बनारस (काशी) इथ त्यांना पाठवण्यात आल. तिथ त्यांनी संस्कृत भाषेबरोबरच वेद, वेदांत, उपनिषदे अशा गोष्टींचा अभ्यास केला. सोळाव्या वर्षापर्यंत त्यांनी बनारस मधे वास्तव्य केल. हे अस दोन टोकाच्या किंवा पूर्ण वेगवेगळ्या व्यवस्थेत शिक्षण घेउन राम मोहन वयाच्या सोळाव्या वर्षी घरी परत आले. घरी परतल्यावर त्यांनी तुहफतूल मुवाहीद्दीन (एकेश्ववरवाद्यांना भेट) नावाचा अरबीत प्रस्तावना असणारा एक लेख फारसीमधे लिहीला. यामधे त्यांनी मूर्तीपूजेवर कडाडून टीका केली होती. त्यांच्यामते मूर्तीपूजा ही वेदांच्या शिकवणुकीच्या विरुद्ध होती. त्या लेखामुळ वडीलांशी त्यांचे पटेनास झाल आणि स्वत्:च घर सोडून निघून गेले.४ डिसेंबर १८२९ रोजी, राजा राम मोहन रॉय आणि इतरांच्या प्रयत्नाला यश येउन, सती प्रथा बंद करण्याविषयीच विधेयक लॉर्ड विल्यम बेंन्टीन्क गव्हर्नर जनरल, व्ह्यायकाऊंट काँबरमीअर कमांडर-इन-चीफ, डब्ल्यू. बी. बेयले आणि सर सी. टी. मेटकाफ यांच्या संयुक्त समीतीन संमत केल. १६ जानेवारी १८३० ला राम मोहन रॉय यांनी लॉर्ड विल्यम बेन्टीन्कला सती प्रथेवर कायद्यान बंदी घातल्याबद्दल अभिनंदन आणि आभाराच एक पत्र पाठवल. परंतू यानंतरही सती प्रथेच्या समर्थक धर्म मार्तंडांनी, तत्कालीन सर्वोच्च न्यायपीठ म्हणजेच प्रीव्ही कौन्सीलपुढे याचिका दाखल केली. दिल्लीचा मुघल बादशहा अकबर दुसरा याच्यावतीन त्याची तनखा वाढवून देण्यासाठी "राजा" हा किताब देउन राम मोहन रॉय यांची नियुक्ती झाली होती. त्या बादशहाची बाजू मांडण्यासाठी राजा राम मोहन रॉय १८३० साली इंग्लडला गेले. तिथे असतानाच त्यांनी सरकारपुढे सती प्रथेविरोधात पुन्हा एकदा बाजू मांडली. ११ जुलै १८३२ रोजी इंग्लंडच्या प्रीव्ही कौन्सीलपुढे या विधेयकाला विरोध करणारी याचिका फेटाळण्यात आली. इंग्लंडमधील स्टेपलटन या गावी २७ सप्टेंबर १८३३ रोजी या महात्म्यान या जगाचा निरोप घेतला. दक्षिण ब्रिस्टल मधील आर्नोस वॅले दफनभूमीत त्यांच दफन करण्यात आल. www.marathisms.blogspot.com
jayanti punyatithi punyadin sms message kavita poem
Raja ram mohan roy