HomeSharad ritu sharad ritu in marathi poem kavita शरद ऋतू Advertisement शरदागम आभाळ निळे नि ढग पांढरे, हवेत आलेला थोडा गारवा कोवळी सकाळ मनमोकळी, घरातळी रंग एक हिरवा साचून राहिल्या गढूळ पाण्याची हळूहळू झाली निर्मळ जळे काठावर उभ्या राहून बाभळी, वाकून पाहती रूप सावळे टवटवलेली सारीच शेते, ज्वारीच्या कुसेत अधीर होत टपोर गर्भ तान्ह्या कणसाचा, पान आडोशात जन्मास येत काळजी करते काळी माती, कशी अजून कपाशी नाही फुलली चौकशी करायला पंख हालवीत, निळे तास पक्षी उतरती खाली शेवंतीला कुणी उगीच सांगे- इतक्यांत तुझी वेळ आली नाही गवतांचे सोने होण्याआधीच, पिवळ्या फुलांची नको करू घाई ! www.marathisms.blogspot.com sharad ritu poem in hindi sharad ritu poem in nepali essay on sharad ritu sharad ritu ayurveda sharad ritu in hindu wikipedia sharad ritu par kavita sharad ritu in english information about sharad ritu in hindi Advertisement Tags: Sharad ritu Facebook Twitter