SMS Category
Home
Ayushya khup sundar aahe kavita
--- आयुष्य हे सुंदर असतं हे ज्याच त्याने ठरवायचं असतं...! स्वप्न फरारीच बघायच ...का अपना बजाज मधे सुख शाेधायचं डिग्री घेऊन सुशिक्षित व्हायचे.... का संस्कार जाेपासून सुसंस्कृत व्हायचे आई वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवायची... का त्यांच्या उतार वयात वृध्दाश्रमाचा चेक फाडायचा. आयुष्य हे सुंदर असतं हे ज्याच त्याने ठरवायचं असतं....! स्वबळावर नवनवीन देश पादाक्रांत करायचे ....का मराठी पणाच्या चौकटीत स्वतःला जखडून ठेवायचं What's Up वर स्वता:च मनोरंजन करायचं .......का आपल्या सानुल्यासोबत सारीपाटात रमायचं. जोडीदारासोबत शरदाचं चांदण शिंपायच...का समाजाच्या जोखडीत वेळोवेळी मरांयच आयुष्य हे सुंदर असतं हे ज्याच त्याने ठरवायचं असतं....! तिन्हीसांजा देव्हा-यात दिवा लावायचा.....का विजय मल्याचा बिझनेस वाढवायचा. मनाच्या गाभा-यात रातराणी फुलवायची...का निवडुंगाचे कुंपण घालून विचार खुंटवायचे. जन्माला आलो म्हणून आयुष्य रेटायचं..... का एकच जन्म आहे म्हणून आयुष्य जगायचं. आयुष्य हे सुंदर असतं हे ज्याच त्याने ठरवायचं आयुष्य आईस्क्रीम सारखं आहे टेस्ट केलं तरी वितळतं, वेस्ट केलं तरी वितळतं !! म्हणुन आयुष्य टेस्ट करायला शीका , वेस्ट तर ते तसंही होतच आहे...... www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
Life
Related Posts
life marathi quotes katha story
jivan kavita in marathi
Jivan kavita in marathi
kavita on life in marathi jivan mha...