SMS Category
Home
Jivan kavita in marathi
सुखामागे धावता धावता विवेक पडतो गहाण पाण्यात राहूनही माशाची भागत नाही तहान स्वप्न सत्यात आणता आणता दमछाक होते खूप वाटी वाटीने ओतले तरी कमीच पडतं तूप बायका आणि पोरांसाठी चाले म्हणे हा खेळ पैसा आणून ओतेन म्हणतो पण मागू नको वेळ करियर होतं जीवन मात्र, जगायचं जमेना तंत्र बापची ओळख मुलं सांगती पैसा छापायचे यंत्र चुकुन सुट्टी घेतलीच तरी स्वत: पाहुणा स्वत:च्याच दारी दोन दिवस कौतुक होतं नंतर डोकेदुखी सारी मुलच मग विचारू लागतात अजुन का हो घरी ?? त्यांचाही दोष नसतो , त्यांना सवयच नसते मुळी. क्षणिक औदसिन्य येतं , मात्र पुन्हा सुरू होतं चक्र करियर करियर दळण दळता दळता, स्वास्थ्य होतं वक्र सोनेरी वेळी वाढत जातात घराभोवती चढलेल्या आतून मात्र मातीच्या भिंती कधीही न सावरलेल्या आयुष्याच्या संध्याकाळी मग एकदम जाणवू लागते काही धावण्याच्या हट्टापायी श्वासच मुळी घेतला नाही सगळं काही पाहता पाहता आरशात पाहणं राहून गेलं सुखाची तहान भागता भागता समाधान दूर वाहून गेलं. www.marathisms.blogspot.com
Life
Related Posts
good thoughts in marathi about life
life marathi quotes katha story
jivan kavita in marathi
Ayushya khup sundar aahe kavita