SMS Category
Home
Gatari Marathi kavita whatsapp status
अमेची पुन्हा रात आली गटारी अम्हा पाहुनी धुंद झाली गटारी कुणी एक प्याला, कुणी 'पिंप'वाला भरे बेवड्यांच्या पखाली गटारी कुणी झिंगलेला, कुणी संपलेला पुसेना कुणाची खुशाली गटारी फिरे आज जो तो घमेंडीत ऐसा करी बावळ्यांना मवाली गटारी अमीरांस लाभे, गरीबांस लाभे वसे दुःखितांच्या महाली गटारी गटारीच्या शुभेच्छा