SMS Category
Home
तु मला आवडतेस
www.marathisms.blogspot.com
तु मला आवडतेस नाही ! मी प्रेम करत नाही तुझ्यावर ! पण होय तु मला आवडतेस. याचा अर्थ असा नाही की मी तुझ्यावर प्रेम करतो. मला कोणाचं बोलणं आवडतं, कोणाचं चालणं. कोणाचे डोळे आवडतात, तर कोणाचं हसणं. याचा अर्थ असा नाही कि मी त्या सा-यांवर प्रेम करतो. कारण, आवड नी प्रेम यात फरक आहे. आवड मर्यादीत. म्हणुनच त्याला विशेषणांची गरज आहे. उगाच का म्हणतो आपण, थोडं आवडतं जास्त आवडतं. कधी म्हणताना ऎकलंय ? माझं थोडंसच प्रेम होतं ! पण प्रेम ? प्रेम म्हणजे? आयुष्यभर एखाद्याची सोबत करावीशी वाटणं, आयुष्याच्या टोकापर्यंत त्याच्या सोबत चालणं ! मग वाट कशीही असो, काट्याकुट्यांची वा मखमलीची, त्यात अंतर नाही. आणी तुझ्या सोबत आयुष्य वाटुन घ्यावं असंतर मला कधीच वाटलं नाही. म्हणुनच म्हणलोना, मी तुझ्यावर प्रेम करत नही. पण, तु मला आवडतेस. तु मला आवडतेस, तुझ्या दिसण्यामुळं ! नव्हे.. तर तुझ्या असण्यामुळं. होय, तुझ्या असण्यामुळं. नुसतं असण्यामुळं म्हणण्यापेक्षा. सोबत असण्यामुळं. हे जास्त बरोबर आहे. बस्स ! अशीच सोबत रहा. कारण तु मला आवडतेस :)
Friendship vs love kavita poem quotes मैत्री विरुद्ध प्रेम
मैत्री विरुद्ध प्रेम एका मुली - मुलात कधी निखळ मैत्री का हो नसते ? नेहमी त्यांच नात काहो प्रेमा वरती येवून फसते ? मैत्रिणी -मैत्रिनित गप्पा आणि मित्रा -मित्रात मजा मुली -मुलाच्याच मैत्रीला प्रेमाची व्हावी सजा ? विरुद्ध लिंगी आकर्षण आणि खो घालतो सहवास हळू हळू वाढते जवळीक अन सुरु प्रेमाचा वनवास उनाड पोरांच्या घोलक्या मधून तो थोडा वेगला होतो प्रेमाच्या त्या जादुपोटी कावळ्यांमध्ये बगळा होतो तीही नंतर दूर होते चिव चिवनार्या सखिंपासून त्या बिचार्या पाहत रहातात तीच वागन आ वासून त्या दोघांच बोलन मग विषय विषायानी वाढत जात मैत्री सारख पवित्र प्रेम आकर्षणवर थांबत जात दोघे नंतर वेगळे होतात निरोप देतात मैत्रीला विराम पडतो त्यान्च्याशिवाय हास्यविनोद अन मस्तिला मित्र फक्त मित्र बनतात औपचारिकतेने बोलायला सख्या फक्त सख्या रहातात खोट्या गप्पा तोलायला त्या घोलक्यातिल मुला मुलित दरी पडत जाते खोल प्रत्येकाला मिलते साथ ढासळत जातो मैत्रीचा तोल मैत्री मधली शुद्धता प्रेमामुळे झिरपत जाते प्रेम आणि मैत्रीमध्ये मैत्री तेवढी विखारत जाते हेवा वाटावा अशी दोस्ती हळू हळू फ़स्त होते फटकळ अशा प्रेमासाठी खरी मैत्री पण स्वस्त होते www.marathisms.blogspot.com
नात तुझ माझ मैत्रीच कि प्रेमाच marathi prem kavita
नात तुझ माझ…………….. नात तुझ माझ मैत्रीच कि प्रेमाच नात तुझ माझ सात जन्माच नात तुझ माझ आपल्या छोटयाश्या विश्वातल नात तुझ माझ एकमेकांच्या साथिच नात तुझ माझ आपल्या स्वप्नातल नात तुझ माझ माझ्या कवितेतल मैत्रीच कि प्रेमाच नात तुझ माझ www.marathisms.blogspot.com
what is love poem kavita in marathi language
प्रेम…. शब्दांनी सांगायचं नसतं प्रेम…. ते डोळ्यांनी साधायचं असतं, आपलं कुणी झालं नाही तरी.. आपण कुणाचतरी व्हायचं असतं…. खरचं प्रेमाचा अर्थ इतका व्यापक आहे? प्रकाशासाठी स्वतः जळणारा तो दिपक आहे.. कोवळ्या इंद्रधनूसारखी मनाचा ठाव घेणारी, प्रेमाची ही कल्पनाचं किती कल्पक आहे…. अर्थहीन जीवनाला नवा अर्थ म्हणजे प्रेम तहानलेल्या भूमीला पावसाचा स्पर्श म्हणजे प्रेम.. अमावस्येच्या अंधाराची समिक्षा घेत, निखळ चंद्राची प्रतिक्षा म्हणजे प्रेम…. म्हणूनच………… जीवनात हवा असतो कुनाचातरी सहवास, गर्द माळरानातल्या एकट्या गुलाबाची आस… विरहाचे दुःख डोळ्यात लपवूनही, भिजलेले डोळे करतात मन उदास……………….. www.marathisms.blogspot.com
सुंदर रचना कविता Prem Kavita प्रेम
तृुणात पाहतो तुला, फुलात मी न्याहाळतो तुझाच सूर होउनी, चराचरात गुंजतो तुझ्याच अंतरी तुला नकळता मी राहातो होउनी मी मंद गंध तुला हळु खुणावतो तुझाच अश्रु होऊनी पापणी मी भिजवतो तुझेच मौन होऊनी अधरी मी विसावतो उदास रात्री या तुझ्या बनूनी चंद्र पाहतो अंगणात मीच आणि पारिजात बरसतो श्वास मी भास मी तुझ्या समीप राहतो तुझाच होऊनी तुला तुझ्यातुनी हिरावतो पद्मश्री चित्रे www.marathisms.blogspot.com
.
prem love story marathi
एका मुलीने ने देवाला विचारलं प्रेम काय असत? देव म्हणाला बागेतून एक फुल घेवून ये. ती मुलगी फूल आणायला गेली , तिला एक फूल आवडल, पन तिला त्यापेक्षा सुंदर फूल हव होत , ती पुढे चालली गेली , पण तिला चांगल फूल नाही मिळाल , जेव्हा ती परत तेच फूल आणायला गेली , तेव्हा ते फूल तिथे नव्हत , तिला खूप पश्चाताप झाला , तिने देवाला येऊन सांगितलं , तेव्हा देव म्हणाला , "हेच आहे प्रेम" जेव्हा प्रेम तुमच्याजवळ असत . तेव्हा त्याची कदर नाही करत , पण जेव्हा ते निघून जाते तेव्हा कळते ते..... www.marathisms.blogspot.com
marathisms.blogspot.com
premacha arth marathi sms kavita
सकाळी डोळे उघडण्या पूर्वी जिचा चेहरा पाहण्याची इच्छा होते ....ते प्रेम आहे मंदिरा मध्ये दर्शन करताना जी जवळ असल्याचा भास होतो ...ते प्रेम आहे भांडून सुधा जिचा राग येत नाही.. ते प्रेम आहे जिच्या कुशीत डोके ठेवल्यावर पूर्ण दिवसाचा थकवा दूर झाल्यासारखे वाटते... ते प्रेम आहे जिच्या कुशीत डोके ठेवल्यावर मन मोकळे झाल्यासारखे वाटते...ते प्रेम आहे स्वताला कितीही त्रास झाला तरीही जिच्यासाठी ख़ुशी मागता .....ते प्रेम आहे जिला लाख विसरण्याचा प्रयत्न करा विसरता येत नाही.... ते प्रेम आहे कुटुंबाच्या फोटो मध्ये आई बाबाच्या सोबत जिचा फोटो असावा असे आपल्याला वाटते.. ते प्रेम आहे जिच्या चुकीना रागावतो आणि नंतर एकांतात हसू येते ....ते प्रेम आहे हि पोस्त वाचताना प्रत्येक ओळीला ज्याची आठवण आली... ते प्रेम आहे. www.marathisms.blogspot.com
marathisms.blogspot.com
love meaning in marathi language poem kavita
प्रेम हे असच असत.... करताना ते कळत नसत आणि केल्यावर ते उमगत नसत... उमगल तरी समजत... नसत पण आपल वेड मन आपलच ऐकत नसत... प्रेमाची भावनाच खूप सुंदर असते ती फक्त त्या दोन जीवांनाच माहित असते. लोक म्हणतात काय असत प्रेमात.. पण मी म्हणतो करून बघा एकदा.. काय नसत प्रेमात...? प्रेम हे सांगून होत नसत... मित्रानो ते झाल्यावरच कळत असत.. दोन जीवांना जोडणारा तो एक नाजूक धागा असतो... दोन हृदयांची स्पंदने एकमेकांना ऐकवणारा एक भाव असतो... प्रेमाची परिभाषाच खूप वेगळी असते... दोन शब्दात ती कधीच समजत नसते .... म्हणूनच प्रेम हे असच असत पण ते खूप खूप सुंदर असते. www.marathisms.blogspot.com
marathisms.blogspot.com
one way love poem
कधी तरी एकतर्फे प्रेम करुन बघा....! नाही केले काही आपल्या साठी तिने .......... तरी तिच्यासाठी काही तरी करुन बघा...! तिच्या साठी आपले जीवन काही नाही...... ... पण तिच्या साठी जगुन< बघा...! . ..आपल्या शब्दाला किंमत नाही...... पण तिच्या शब्दाला किंमत द्यायला< शिका.....! आपले अश्रु म्हणजे पानी ........ पण तिच्या अश्रुना मोती म्हणायला शिका....!< एक तर्फे का होई ना पण जिवापाड प्रेम करून बघा ....! www.marathisms.blogspot.com
tu ani mi marathi sms kavita poem
तू ... तू ... निखळ हसणारी एक चांदणी, अन मी बावरलेला एक चंद्र ... तू ... पावसाच्या पहिल्या सरीचा थेंब, अन मी त्या थेंबातले प्रतिबिंब ... तू ... सोनेरी संध्याकाळ काहुरलेली,अन मी तुझ्यात बुडणारा सूर्य हुरहुरलेला... तू ... एक लाट किना-याजवळ घुटमळणारी,अन मी किनारा तुला अडवू पाहणारा ... तू ... सावली उन्हामधली मला बिलगून चालणारीअन मी एक उनाड ढग तुला लपवणारा ... तू ... एक मोरपीस मोहरलेले अन मी पुस्तकाचे पान तुला आयुष्यभर जपणारा www.marathisms.blogspot.com
Subscribe to:
Posts ( Atom )