SMS Category
Home
Ayushya khup sundar aahe kavita
--- आयुष्य हे सुंदर असतं हे ज्याच त्याने ठरवायचं असतं...! स्वप्न फरारीच बघायच ...का अपना बजाज मधे सुख शाेधायचं डिग्री घेऊन सुशिक्षित व्हायचे.... का संस्कार जाेपासून सुसंस्कृत व्हायचे आई वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवायची... का त्यांच्या उतार वयात वृध्दाश्रमाचा चेक फाडायचा. आयुष्य हे सुंदर असतं हे ज्याच त्याने ठरवायचं असतं....! स्वबळावर नवनवीन देश पादाक्रांत करायचे ....का मराठी पणाच्या चौकटीत स्वतःला जखडून ठेवायचं What's Up वर स्वता:च मनोरंजन करायचं .......का आपल्या सानुल्यासोबत सारीपाटात रमायचं. जोडीदारासोबत शरदाचं चांदण शिंपायच...का समाजाच्या जोखडीत वेळोवेळी मरांयच आयुष्य हे सुंदर असतं हे ज्याच त्याने ठरवायचं असतं....! तिन्हीसांजा देव्हा-यात दिवा लावायचा.....का विजय मल्याचा बिझनेस वाढवायचा. मनाच्या गाभा-यात रातराणी फुलवायची...का निवडुंगाचे कुंपण घालून विचार खुंटवायचे. जन्माला आलो म्हणून आयुष्य रेटायचं..... का एकच जन्म आहे म्हणून आयुष्य जगायचं. आयुष्य हे सुंदर असतं हे ज्याच त्याने ठरवायचं आयुष्य आईस्क्रीम सारखं आहे टेस्ट केलं तरी वितळतं, वेस्ट केलं तरी वितळतं !! म्हणुन आयुष्य टेस्ट करायला शीका , वेस्ट तर ते तसंही होतच आहे...... www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
Jivan kavita in marathi
सुखामागे धावता धावता विवेक पडतो गहाण पाण्यात राहूनही माशाची भागत नाही तहान स्वप्न सत्यात आणता आणता दमछाक होते खूप वाटी वाटीने ओतले तरी कमीच पडतं तूप बायका आणि पोरांसाठी चाले म्हणे हा खेळ पैसा आणून ओतेन म्हणतो पण मागू नको वेळ करियर होतं जीवन मात्र, जगायचं जमेना तंत्र बापची ओळख मुलं सांगती पैसा छापायचे यंत्र चुकुन सुट्टी घेतलीच तरी स्वत: पाहुणा स्वत:च्याच दारी दोन दिवस कौतुक होतं नंतर डोकेदुखी सारी मुलच मग विचारू लागतात अजुन का हो घरी ?? त्यांचाही दोष नसतो , त्यांना सवयच नसते मुळी. क्षणिक औदसिन्य येतं , मात्र पुन्हा सुरू होतं चक्र करियर करियर दळण दळता दळता, स्वास्थ्य होतं वक्र सोनेरी वेळी वाढत जातात घराभोवती चढलेल्या आतून मात्र मातीच्या भिंती कधीही न सावरलेल्या आयुष्याच्या संध्याकाळी मग एकदम जाणवू लागते काही धावण्याच्या हट्टापायी श्वासच मुळी घेतला नाही सगळं काही पाहता पाहता आरशात पाहणं राहून गेलं सुखाची तहान भागता भागता समाधान दूर वाहून गेलं. www.marathisms.blogspot.com
kavita on life in marathi jivan mhanje kay in marathi
यालाच 'जीवन' म्हणतात....... बघायला गेलं तर आयुष्यही खूप सोपे असत..!! जगायला गेलं तर दु:खातही सुख असत..!! चालायला गेलं तर निखारेही फूले होतात..!! तोंड देता आले तर संकटही शुल्लक असत..!! वाटायला गेलं तर अश्रूंतही समाधान असत..!! पचवायला गेलं तर अपयशही सोपे असत...!! हसायला गेल तर रडणेही आपल असत .....!! बघायला गेलं तर आयुष्यही खूप सोपे असत.. आपल्या सावली पासून आपणच शिकावे कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावे शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत... म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावे ॥ www.marathisms.blogspot.com
marathisms.blogspot.com
good thoughts in marathi about life
रस्त्याने चालताना असे चाला की लोकांनी राम राम घातला पाहीजे... . बसताना असे बसा की लोक शेजारी येऊन बसले पाहीजे... . आणि . मरताना असे मरा की ज्याला कळेल त्याच्या डोळ्यातुन खळाखळा पाणी आल पाहीजे... . जीवनाचे सार्थक फक्त येवढ्याच गोष्टीत आहे !!!...... . . कलीयुगाचे पर्व आहे.., प्रत्येकालाच इथे गर्व आहे...! मी आहे तरच सर्व आहे..., नाहीतर सर्व व्यर्थ आहे...!! अरे वेड्या..! कुणा वाचून कुणाच राहात नसतं.., आदर कर सर्वांचा, हाच खरा मानव धर्म आहे...!!! www.marathisms.blogspot.com
life marathi quotes katha story
एका माणसाचं निधन होतं हे त्याच्या लक्षात येतं जेव्हा साक्षात भगवंत हातात सूटकेस घेऊन त्याच्या समोर प्रगटतात. भगवंत अाणि त्या माणसामधील संवाद भगवंत - वत्स, चल अाधीच उशिर झालाय ! माणूस - पण देवा मला तर तुम्ही फार लवकर आणलंत. मला आणखी खुप काही करण्याची इच्छा अाहे. भगवंत - माफ कर, अगोदर च फार उशीर झाला आहे. माणूस - पण भगवंता, ह्या सूटकेस मध्ये काय आहे ? भगवंत - जे आहे ते तुझंच आहे ! माणूस - माझं म्हणजे माझ्या वस्तू, कपडे पैसे..... भगवंत - ते काही नाही कारण त्या सर्व भुतलाशी संबंधित आहेत. माणूस - माझ्या आठवणी ? भगवंत - त्या काळाशी संबंधित आहेत. माणूस - माझं क्रतुत्व भगवंत - नाही ते परिस्थितीशी संबंधित आहे. माणूस - माझे मित्र आणि परिवार भगवंत - नाही वत्सा ते तर तुझ्या प्रवासातील सोबती होते माणूस - माझी पत्नी व मुलं भगवंत - ते तर तुझ्या ह्रुद्यात आहेत. माणूस - मग माझं शरीर भगवंत - नाही, नाही ते तर राख झालं माणूस - मग नक्की माझा आत्मा असेल भगवंत - वत्सा तु परत चुकलास तुझा आत्मा तर माझ्याशी संबंधित आहे. माणसाच्या डोळ्यातून अाता अश्रु येऊ लागतात. त्याने भगवंताच्या हातातून सूटकेस घेतली आणि मोठ्या आशेने उघडून बघितली तर काय ....... रिकामी निराश होऊन डोळ्यातील अश्रु पुसत माणूस - म्हणजे माझं स्वता:चं काहीच नाही ? भगवंत - अगदी बरोबर, तुझ्या मालकीच कधीच काही नव्हतं. माणूस - मग त्या सगळ्याचा अर्थ काय ?? जीवन हे क्षणभंगुर आहे. फक्त .... छान जगा प्रेम करा मिळालेल्या जिवनाचा उपभोग घ्या www.marathisms.blogspot.com
jivan kavita in marathi
माझं घर तसं तीन खोल्यांचेच होतं- आजोबांपासून नातवापर्यंत भरलेलं होतं पोपट, कुत्रा, मांजरांना मुक्तद्वार होतं- घरादाराला कधीही 'लॉक' नव्हतं... तरीही माझं जीवन सुखाचं होतं ||१|| आजोबांचं स्थान घरात सर्वोच्च होतं- स्वयंपाकघर आजीच्या ताब्यात होतं, पाहुण्यांचं येणं-जाणं नित्याचंच होतं- आई-बाबांना एकमेकांशी बोलताही येत नव्हतं... तरीही माझं जीवन सुखाचं होतं ||२|| घरासमोर छोटंसं अंगण होतं- तुळस, प्राजक्ताला तिथे फुलता येत होतं, दारात रांगोळी काढणे अनिर्वाय होतं- विहिरीवरून पाणी भरणं कष्टाचं होत, तरीही माझं जीवन सुखाचं होतं ||३|| आंघोळीला लाईफ़बॉय साबण असायचा, माणसापासून म्हशीपर्यंत सगळ्यांनाच चालायचा, दात घासायला कडुलिंबाचा फाटा लागायचा- दगडाने अंग घासणं फारसं सुसह्य नव्हतं तरीही माझं जीवन सुखाचं होतं ||४॥ पायात चप्पल असणं सक्तीचं नव्हतं- अंडरपँट बनियनवर फिरणं जगन्मान्य होतं शाळेसाठी मैलभर चालण्याचं अप्रूप नव्हतं- मोठ्यांना सायकलशिवाय दुसर वाहन नव्हतं... तरीही माझं जीवन सुखाचं होतं ||५॥ शाळेत गुरुजनांप्रती आदर होता- घोकंपट्टीला दुसरा पर्यायच नव्हता, पाढे पाठांतराचा आग्रह सर्वत्र होता- छडी हे शिक्षकाचं लाडकं शस्त्र होतं.. तरीही माझं जीवन सुखाचं होतं ||६॥ शाळेत गरीब श्रीमंत हा भेदभाव नव्हता- नादारी सांगण्यात काही संकोच नव्हता, अंगणात येवून शिकणाराही एक वर्ग होता- कलांना "भिकेचे डोहाळे" असंच नाव होतं, तरीही माझं जीवन सुखाचं होतं ||७॥ नव्या कपड्यांचा लाभ लग्न-मुंजीतच व्हायचा- पाटाखालच्या इस्त्रीला पर्याय नसायचा, शाळेचा युनिफॉर्म थोरल्याकडूनंच मिळायचा- तिन्हीसांजेला घरी परतणं सक्तीचं होतं, तरीही माझं जीवन सुखाचं होतं ||८|| वळचणीत चिमण्यांच्या पिढ्या नांदायाच्या- पोपटांचा थवा झाडावर विसावायचा, कुत्रा, मांजर, डुकरानी गाव भरलेला असायचा- उंदीर, डास, ढेकुण यांचं सार्वभौम राज्य होतं... तरीही माझं जीवन सुखाचं होतं ||९|| पुस्तकातले प्राणी अचानक रानात दिसायचे- घाबरगुंडी उडाली तरी ते आपलेच वाटायचे, उरलेले प्राणी नंतर पेशवेपार्कात भेटायचे- नॉनवेज खाणं हे तर माहितीच नव्हतं, तरीही माझं जीवन सुखाचं होतं ||१०|| शाळेत अभ्यासाला खूप महत्व होते- नंबरावर बक्षीस/छड्या यांचे प्रमाण ठरत होतं, कॉपी, गाईड, क्लासेसना स्थानही नव्हतं- वशिल्याने पास होणं माहितीच नव्हतं, तरीही माझं जीवन सुखाचं होतं ||११|| गावची जत्रा हीच एक करमणूक असायची– चक्र, पाळण्यात फिरण्यात मजा मिळायची, बुढ्ढीके बाल, गाठीशेवेची तोंडलावणी व्हायची- विमानातला फोटो काढणं चमत्कारिक होतं, तरीही माझं जीवन सुखाचं होतं ||१२|| गावाबाहेरचं जग हिरवंगार असायचं- सगळ्या नद्यांचे पाणी स्वच्छंच असायचे, पावसाळ्यात ढगांनी आकाश भरायचं- प्रदूषण, पर्यावरण वगैरे माहितीच नव्हतं, तरीही माझं जीवन सुखाचं होतं ||१३|| हुतुतू आट्यापाट्याचा खेळ गल्लीत चालायचा- क्रिकेटच्या मॅचेस चाळीत व्हायच्या, बापू नाडकर्णी, चंदू बोर्डेच्या गोष्टी रंगायच्या- डे-नाईट, ट्वेंटी-२० चे नावही नव्हते, तरीही माझं जीवन सुखाचं होतं ||१४|| प्रवास झालाच तर एस्. टी. नेच व्हायचा- गचके, ठेचकाळणे याला अंत नसायचा, होल्डॉलसोबत फिरकीचा तांब्याही लागायचा- लक्झरी, फर्स्टक्लास, एसीचं नावही नव्हतं, तरीही माझं जीवन सुखाचं होतं || १५ || दिवाळी ख-या अर्थाने दिवाळी होती- चमन चिडी, पानपट्टी, भुईनळ्या यांची रात्र होती, रंगीत तेल, उटणे, मोती साबणाची ऐश होती- लाडू, चकल्या, करंज्या यांचे दर्शन वार्षिकंच होतं... तरीही माझं जीवन सुखाचं होतं ||१६|| जुनाट रेडिओतून आकाशवाणी बरसायाची- बिनाका गीतामालेने बुधवारची रात्र सजायची, रेडीयो सिलोनने तारुण्याची लज्जत वाढायची- ताई, नाना हरबा यांच्या इतकाच बालोद्यान असायचा, तरीही माझं जीवन सुखाचं होतं ||१७|| खाण्याच्या बाबतीत भेदभाव केला जायचा- दादाच्या ताटात जास्त शिरा पडायचा, पानात टाकणा-याच्या पाठीत रट्टा बसायचा- हॉटेलात जाणं तर पूर्ण निषिद्ध होतं, तरीही माझं जीवन सुखाचं होतं ||१८|| मामाच्या गावाला कधी जाणं-येणं होतं- दंगामस्ती करायला नॅशनल परमिट होतं, विहिरीत पोहायला तिथेच मिळत होतं- भाऊबीजेला आईच्या ताटात फारसं पडत नव्हतं, तरीही माझं जीवन सुखाचं होतं ||१९|| घरातले पुरुष कर्तेसवरते असायचे- बायांना दुपारी झोपणं माहिती नसायचं, पोराबाळांना गोडधोड सणावारीच मिळायचं- प्रायव्हसीला तिथे काडीचंही स्थान नव्हतं, तरीही माझं जीवन सुखाचं होतं ||२०|| पाव्हणे रावळे इ. चा घरात राबता असायचा- सख्खा, चुलत, मावस असा भेदभाव नसायचा, गाववाल्यांनाही पंक्तीत सन्मान असायचा- पंक्तीत श्लोक म्हणणं मात्र सक्तीचं होतं, तरीही माझं जीवन सुखाचं होतं ||२१|| आज घराऐवजी लक्झुरीयस फ्लॅट आहे- मोपेड, स्कूटर, मोटारचा सुळसुळाट आहे, टीव्हीवर शंभर वाहिन्यांचा दणदणाट आहे- फास्टफूड, पार्ट्या, ड्रिंक्स यांना सन्मान आहे, कौटुंबिक सुसंवादाची मात्र वानवा आहे ||२२|| आज मुलांसाठी महागडी शाळा-कॉलेजेस आहेत- दूध, बूस्ट, कॉम्प्लानचा भरपूर मारा आहे, क्लास, गाईड, कॅलक्युलेटरची ऐशच ऐश आहे- कपडे, युनिफॉर्म, क्रीडासाहित्य हवे तितके आहे, बालकांच्या नशिबी मात्र पाळणाघर आहे ||२३|| आज पतीला ऑफिसात मरेपर्यन्त काम आहे- सुशिक्षित पत्नीला करियरचा हव्यास आहे, एक्स्ट्रा अॅक्टिविटीजना घरात सन्मान आहे- छंद, संस्कार यांच्यासाठी क्लासेस उपलब्ध आहेत, आजीआजोबांना मात्र वृद्धाश्रमाचा रस्ता मोकळा आहे ||२४|| आज घरात प्रचंड आर्थिक सुबत्ता आहे- मागेल ती वस्तू क्षणात हजर होते आहे, इन्स्टॉलमेंट, क्रेडीट कार्डचा सुळसुळाट आहे- सध्या ‘बाय् वन् गेट वन्’ चा जमाना आहे... म्हणून... पैशावर समाधान फ्री मिळण्याची मी वाट पहात आहे www.marathisms.blogspot.com
marathi ayushya message for whatsapp
मनात खुप कही असतं सांगण्यासारखं.. पण कही वेळा शांत बसनचं बरं आसतं ... आपलं दुख मनात ठेवून आश्रू लपवान्यातचं भलं आसतं ... एकांतात रडलं तरी चालेल , लोकांमधे मात्र हासावचं लागतं ... जीवन हे आसच आसतं, ते आपलं आसलं तरी ते इतरांसठिचं जगायचं आसतं ... www.marathisms.blogspot.com
जेव्हा आयुष्य हसवेल..
जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे. www.marathisms.blogspot.com
marathi jeevan vichar "हुकुमचा एक्का"
एक वेळ हार पत्करा पण कोणासाठी युज एण्ड थ्राे होवू नका स्वतः ला "एक्का" समझा कारण "गल्लीतल्या दुर्री तिर्री सोबत बसून स्वतः ला बादशाह समजणारे बरेच कागदी पत्ते असतात" पण डाव बदलणारा एकच असतो ... एकच ...... "हुकुमचा एक्का",,,, एखाद्याजवळ आपल्या अश्या आठवणी ठेवून जा.. की नंतर त्याच्या जवळ आपला विषय जरी निघाला तर... त्याच्या ओठांवर थोडस हसु आणि डोळ्यात थोडस पाणी नक्कीच आल पाहिजे......!" पैशाने गरिब असलात तरी चालेल पण मनाने श्रीमंत रहा www.marathisms.blogspot.com
great line on life
कधी हसवतात , कधी रडवतात क्षण हे आयुष्याच्या झाडावरुन, पानांसारखे पडत असतात www.marathisms.blogspot.com
life status in marathi
Nate Tech 'sath' Denare, Jivan Tech 'Aanand' Denare, Mitra Tech 'Bhavna' samjnare, Aani Aayushya Tech saglyana japnare. www.marathisms.blogspot.com
Subscribe to:
Posts ( Atom )