SMS Category
Home
Punekar jokes
पुणेकर- काका ८ समोसे द्या दुकानदार- पार्सल देऊ ? पुणेकर- नाही आ करतो कोंबा तोंडात www.marathisms.blogspot.com
puneri funny jokes
नवीन जन्माला आलेल्या बाळाला(नवजात अर्भक :P) नर्स विचारते, "बाळा तू नाश्त्याला काय घेणार ? पोहे की साबुदाण्याची खिचडी ?? " बाळ म्हणत, " च्यायला, परत पुण्यात च आलो वाटतं !! www.marathisms.blogspot.com
marathisms.blogspot.com
Puneri Kissa
पुणेरी बँकेतला किस्सा : ग्राहक – “आज चेक डिपॉंजीट केला तर जमा केव्हा होईल??” कारकून -” ३ दिवसांनी” ग्राहक – “”अहो बँक समोरच तर आहे…..फक्त रस्ता क्रॉस करायचा आहे….तरीही एवढा वेळ ??” कारकून – “अहो ती प्रोसिजर आहे….. समजा उद्या तुम्ही स्मशानाबाहेर मेलात तर डायरेक्ट स्मशानात नेऊन जाळतील कि रीतसर घरी नेऊन मग जाळतील ??” www.marathisms.blogspot.com
Puneri Jokes patya sms
Macdonalds
1. आमचे येथे बर्गर मिळतील. तसेच बाहेरील खाद्य पदार्थांस एक रुपयात सॉस लावून मिळेल. 2. ह्या ब्रांचचे मालक इथेच जेवतात (टीप: मालकांच्या वजनाची चौकशी करू नये) 3. दोन माणसात तोंड पुसायचे तीन कागद मिळतील. नंतर ज्यादा आकार पडेल. 4. कारणाशिवाय बसू नये. कारण काढूनही बसू नये. फक्त खाण्यासाठीच बसायची सोय आहे. 5. टि.व्ही. चालू ठेवायचा किंवा नाही हा निर्णय व्यवस्थापनाचा आहे. तरी बंद टिव्हीचा आरशासारखा उपयोग करून केस वगैरे विंचरू नयेत. 6. टि.व्ही. चालू असेल तरी फार पहात बसू नये. हे खाद्यगृह आहे प्रेक्षागृह नव्हे. 7. कृपया फ्रेंच फ्राईज मोजून घ्यावेत. नंतर तक्रार चालणार नाही. (लहान साईज: ४६ फ्राईज, मध्यम : २७ फ्राईज, मोठा: १७ फ्राईज) 8. गि-हाईकांचा संतोष हेच आमचे ध्येय. (व्यवसायाच्या वेळा : ११ ते १ व ४ ते ८ / तक्रारीची वेळ : ११ ते ११.०५) 9. पहिल्या दहा मिंटात ऑर्डर मिळाली नाही तर पुढच्या दहा मिंटात मिळेल. पैसे परत मिळणार नाहीत. 10. कृपया ड्राईव थ्रू च्या खिडकीवरील मुलीशी गप्पा मारू नयेत. 11. विनाकारण सॉस मागू नये. टोमाटो फुकट मिळत नाहीत. 12. शीतपेयाच्या ग्लासच्या झाकणास भोक पडलेले नाही तर चोखनळी (स्ट्रॉ) साठी पाडलेले आहे. ते बदलून मिळणार नाही ह्याची नोंद घ्यावी. 13. दुस-या कंपनीच्या बरगरच्या किमती इथे सांगू नयेत. 14. उरलेले अन्न नेण्यास घरून डबा आणावा. कागदी वा प्लास्टिक पिशवी मिळणार नाही. 15. हॅपी मिलची खेळणी संपलेली आहेत (ही पाटी कायमची का आहे ते विचारू नये) 16. आमची कुठेही शाखा आहे ! (पण दुस-या शाखेच्या तक्रारी इथे सांगू नयेत) 17. कृपया बाहेरील आमच्या जोकरच्या पुतळ्याशी फार लगट करू नये. सभ्यपणे फोटो काढावेत. 18. शीतपेय संपल्यावर ग्लास टाकून द्यावा. चोखनळीने विचित्र आवाज करत बसू नये. - हुकूमावरून
Subscribe to:
Posts ( Atom )