SMS Category
Home
Narali purnima wikipedia information essay nibandh mahiti history in marathi
आपल्या हिंदू संस्कृतीचा पाया कृतज्ञता वं सहिष्णुतेवर आधारलेला आहे. आपण आपली कृतज्ञतापण सणांच्यामार्फत वाजत गाजत साजरी करतो.आपल्या पूर्वजांनी फार कल्पकतेने सणांची रचना केली आहे. ज्याच्यामुळे श्रावणात धरती हिरवाईने नटलेली असते. चहूकडे चैतन्याचे झरे वाहत असतात.त्या वरुणाला म्हणजेच जलदेवतेला ते कसे विसरतील? त्याच जलदेवतेप्रती आदरपूर्वक, प्रेमपूर्वक कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे नारळीपौर्णिमा. शास्त्राप्रमाणे श्रावण पौर्णिमेस सागराची पूजा करून त्याला श्रीफळ अर्पण करतात म्हणून या दिवसाला नारळी पौर्णिमा असे म्हणतात. जरी श्रीफळ सागराला अर्पण करावयाचे असले तरी हेतू संपूर्ण जलदेवतेची पूजा हाच आहे. कोळी समाजाचा आणि सागराचा संबध अतूट असल्याने ते नारळी पौर्णिमा वाजतगाजत, थाटामाटात आणि अतिशय जल्लोषात साजरी करतात. पालखी सजवून तिच्यात सोन्याचा नारळ (सोन्याचा मुलामा) ठेऊन नाचत, गात अतिशय आनंदाने मिरवणूक काढून समुद्रकिनाऱ्यावर येतात. सूर्यास्ताबरोबर नारळाची पूजा करून दर्या देवताला नारळ समर्पण करतात. वं प्रार्थना म्हणतात. “पर्जन्य वर्षावाने उधाणलेल्या दर्यादेवा शांत हो वं तुझ्या लाटा सौम्य होऊन आमचे वादळ, तुफान इत्यादीपासून रक्षण कर.” हिंदू धर्मात पूजाविधीत नारळाला फार महत्व आहे. नारळाला श्रीफळ असेही म्हणले जाते. श्री म्हणजे लक्ष्मी आणि श्रीफळ म्हणजे नारळ. नारळाच्या बहुविध गुणांमुळेच नारळाला पवित्र फळ म्हणून मान्यता मिळाली आहे. नारळात अनेक ओषधी गुण आहेत. शरीराचा दाह,उष्णता कमी करण्यासाठी ओले खोबरे खावे. रक्त पडल्यास साखर खोबरे खावे रक्त पडावयाचे थांबते. खोकल्यातून रक्त आल्यास मनुक्याबरोबर खोबरे खावे. ओले खोबरे खाल्ल्यास जास्त तहान लागत नाही. नारळाचे दूध बळ वाढविते. पाणी लघवी साफ करते, तूप अर्धांगावर उपयोगी आहे. तेल केसांची निगा राखते, चोथा सूज उतरवतो तर चोथा जाळून मधातून घेतल्यास उलटी,उचकी थांबते. इतकेच काय तर करवंटीदेखील उगाळून वा पेटवून तव्यावर ठेवल्यास त्याचे जे तेल येते त्याने खरूज नायटयासारखे त्वचारोगही बरे होतात. नारळाच्या झाडाच्या फांद्या व खोडापासून अनेक उपयोगी वस्तू तयार होतात. म्हणूनच माडाला कल्पवृक्ष असेही म्हणतात. अशा या नारळी पौर्णिमेचा दुहेरी उद्देश आहे जे व्यवस्थीत समजून घेऊनच आपण हा सण साजरा केला पाहिजे. पाहिला उद्देश… नारळाची पूजा म्हणजेच निसर्गाची पूजा अर्थात वृक्षवल्ली आम्हा सोयरीप्रमाणे झाडे लावा झाडे वाचवा. व दुसरा उद्देश… जलदेवता म्हणजेच सागर वं पर्जन्याबद्दल कृतज्ञता बाळगा. www.marathisms.blogspot.com
Narali Purnima Wishes poem song kavita shubhechcha नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
रात पुनवेचं चांदनं प्याली...... कशी चांदीची मासोली झाली...... माज्या जाल्यात होऊन आली..... नेतो बाजारा, भरून म्हावरां ताजा..... मी डोलकरं, डोलकरं, डोलकरं दर्याचा राजा.... नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा www.marathisms.blogspot.com
wikipedia information essay speech koli geet
Narali purnima sms message in marathi
ह्या मोसमात पापलेट, सुरमई, रावस, हलवा, घोळ, मोरी, बांगडा, बोंबिल, मांदेली यांची रेलचेल होऊन महाराष्ट्रातील सर्व कोळीवाड्यांत भरभराट होवो, या सदिच्छांसह नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा www.marathisms.blogspot.com
Subscribe to:
Posts ( Atom )