SMS Category
Home
Mahatma Phule works essay life Biography in marathi
जीवनपट इ.स. १८२७ - जन्म कटगुण, सातारा जिल्हा इ.स. १८३४ ते १८३८ - पंतोजींच्या शाळेत शिक्षण झाले. इ.स. १८४० - सावित्रीबाईंशी विवाह. इ.स. १८४१ ते १८४७ - स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये इंग्रजी शिक्षण घेतले. इ.स. १८४७- लहुजी वस्ताद साळवे दांडपट्टा व इतर शारीरिक शिक्षण घेतले. इ.स. १८४७ - थॉमस पेन यांच्या 'राईट ऑफ मॅन' या ग्रंथाचा अभ्यास. इ.स. १८४८ - मित्राच्या विवाहप्रसंगी निघालेल्या मिरवणुकीत उच्चवर्णीयांकडून अपमान झाला. इ.स. १८४८ - भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काम सुरू केले. सप्टेंबर ७, इ.स. १८५१ - भिडे वाड्यात व रास्ता पेठेत मुलींच्या शाळेची सुरुवात. इ.स. १८५२ - पूना लायब्ररीची स्थापना. मार्च १५, इ.स. १८५२ - वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली. नोहेंबर १६, इ.स. १८५२ - मेजर कॅन्डी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकारतर्फे विश्रामबाग वाड्यात सत्कार. इ.स. १८५३ - 'दि सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार मांग ॲन्ड अदर्स' स्थापन केली. इ.स. १८५४ - स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी इ.स. १८५५ - रात्रशाळेची सुरुवात केली. इ.स. १८५६ - जोतीबांवर मारेकरी घालून हत्येचा प्रयत्न झाला. इ.स १८५८ - शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून निवृत्ती घेतली. इ.स. १८६० - विधवाविवाहास साहाय्य केले. इ.स. १८६३ - बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली . इ.स. १८६५ - विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला. इ.स. १८६४ - गोखले बागेत विधवाविवाह घडवून आणला. इ.स. १८६८ - दुष्काळ काळात राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला. इ.स. १८७३ - सत्यशोधक समाजची स्थापना केली. इ.स. १८७५ - शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध खतफोडीचे बंड घडवून आणले ( अहमदनगर). इ.स. १८७५- स्वामी दयानंद सरस्वतींची पुण्यात मिरवणूक काढण्यास साहाय्य केले. इ.स. १८७६ ते १८८२ - पुणे नगर पालिकेचे सदस्य होते. इ.स. १८८० - दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला. इ.स. १८८० - नारायण मेघाजी लोखंडे यांना 'मिलहॅण्ड असोसिएशन' या देशातील पहिल्या कामगार संघटनेच्या स्थापनेत साहाय्य केले. इ.स. १८८२ - 'विल्यम हंटर शिक्षण आयोगा' समोर निवेदन दिले. यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली. इ.स. १८८७ - सत्यशोधक समाजातर्फे नवीन मंगलाष्टकांची व नवीन पूजाविधीची रचना करून पुरोहिताशिवाय विवाह घडवून आणण्यास सुरुवात केली. इ.स. १८८८- ड्यूक ऑफ कॅनॉट यांची भेट आणि सत्कार. इ.स. १८८८ - मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादुर वडेकर यांच्या हस्ते सत्कार करून 'महात्मा' ही पदवी प्रदान केली. २८ नोव्हेंबर, इ.स. १८९० - पुणे येथे निधन झाले. www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
Happy Children's Day kavita story katha poem sandesh message sms
information nibandh details mahiti msg
Mahatma Phule Smrutidin sms message status
महात्मा जोतीबा फुले (एप्रिल ११, इ.स. १८२७ - नोव्हेंबर २८, इ.स. १८९०) हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन पुरोगामी विचारांची मांडणी केली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणास प्रोत्साहन देऊन मुहुर्तमेढ रोवली. त्यांनी भारतातील मुलींची पहिली शाळा १८४८ साली पुणे येथे भिडेंच्या वाड्यात उघडली. आपल्या पुरोगामी विचारांची निर्भयपणे मांडणी केली व स्वत:चे विचार आचरणात आणले.महात्मा ज्योतीराव फुले यांनी आपले व्यक्तिमत्व स्वयंप्रेरणेने व स्वतःच्या प्रयत्नांनी घडविले होते. त्यांचा पिंड हा कृतीशील क्रांतिकारकाचा होता.महाराष्ट्राच्या समाजसेवेसाठी ध्येयाने भरून जाऊन आपले सर्व जीवन समर्पित करणारे ते थोर पुरुष होते.आधुनिक भारतातले पहिले समाजक्रांतिकारक म्हणून त्यांना ओळखले जात असत.कारण ते सामन्यातील असले तरी विचाराने व कर्तुत्वाने असामान्य होते.सामाजिक विषमतेविरुद्ध ज्योतीबांनी बंड पुकारले. 'शिक्षण व समता' या दोन शब्दातच त्यांच्या या कार्याचे यथोचित वर्णन करता येईल.महाराष्ट्रातील सर्वसामान्यांसाठी रात्रंदिवस झटणारे ते सेवक होते. अशा या क्रांतीसुर्यास विनम्र आदरांजली www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
information details essay nibandh
Happy Mahatma Jyotiba Phule Jayanti shubhecha महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
खऱ्या खुऱ्या स्वतंत्र भारताचे स्वप्न ज्यांनी बघितले , भारतीय समाज रचनेचा कायापालट करणारा एक महान क्रांतिसूर्य, भारतीय स्त्रियांसाठी साक्षात स्वातंत्र्य मूर्ती ... महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा www.marathisms.blogspot.com
Mahatma phule Jayanti message in Marathi Language for whatsapp status
सामाजिक समतेचा संदेश देणारे आणि शिक्षणाचा उपयोग करून सर्वांना खरा खुरा स्वतंत्र मिळवून देणारे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा www.marathisms.blogspot.com
Mahatma Phule Jayanti sms messgae in Marathi for whatsapp
सामान्य माणसांसाठी .. दुर्लक्षित समाजासाठी लढणारे एक असामान्य व्यक्तिमत्व. केवळ आपल्या कर्माने ज्यांनी महात्मा हि पदवी मिळवली असे महात्मा ज्योतिबा फुले. यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा www.marathisms.blogspot.com
Mahatma Phule speech biography information in marathi essay nibandh work महात्मा जोतीबा फुले सामाजिक कार्य
महात्मा जोतीबा फुले (एप्रिल ११, इ.स. १८२७ - नोव्हेंबर २८, इ.स. १८९०) हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन पुरोगामी विचारांची मांडणी केली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणास प्रोत्साहन देऊन मुहुर्तमेढ रोवली. त्यांनी भारतातील मुलींची पहिली शाळा १८४८ साली पुणे येथे भिडेंच्या वाड्यात उघडली. आपल्या पुरोगामी विचारांची निर्भयपणे मांडणी केली व स्वत:चे विचार आचरणात आणले. सप्टेंबर २३, इ.स. १८७३ रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. पुरोहितांकडून होणाऱ्या अन्यायापासून, अत्याचारापासून व गुलामगिरीतून तथाकथित शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.'सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥' हे समाजाचे घोष वाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.शिक्षणाचे महत्त्व पटवून देणार्या त्यांच्या कवितेच्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत. - “ विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली। नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।। ” जोतीरावांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत. www.marathisms.blogspot.com
Subscribe to:
Posts ( Atom )