SMS Category
Home
Parshuram jayanti sms message in Marathi biography information essay project परशुराम जयंती
परशुराम हे भगवान विष्णूंचा सहावा अवतार समजले जातात. जमदग्नी व रेणुकामाता यांच्या पोटी यांचा जन्म झाला. धारिणीशी विवाह केला. ब्राह्मण असून क्षत्रियांचे सर्व गुण यांच्यात होते, म्हणूनच त्यांना "शरादपि शापादपि" असे म्हणतात. भगवान शंकरांकडून त्यांनी परशू हे शस्त्र घेतले आणि अनेक विद्या आत्मसात केल्या. त्याच विद्यांच्या जोरावर त्यांनी दुष्ट आणि प्रजेला जाच करणाऱ्या राजांचा बंदोबस्त केला. त्याच वेळी त्यांनी सहस्रार्जुनाला ठार केले. पुढे राजांना जिंकून ताब्यात घेतलेली जमीन त्यांनी ऋषिकुलाला देऊन ते महेन्द्र पर्वतावर तप करण्यासाठी निघून गेले. त्यानंतर त्यांचा उल्लेख सीता स्वयंवरात येतो. तेथे त्यांनी शिवधनुष्य तोडणाऱ्या रामाला आव्हान दिले. मात्र राग शांत झाल्यावर आपल्याकडील धनुष्य त्यांनी रामाला भेट दिले. पुढे त्यांनी भीष्मांना त्या सगळ्या विद्या दिल्या. नंतर अंबेच्या याचनेवरून त्यांनी भीष्मांशी युद्ध केले. भीष्म हरले पण तरीही त्यांनी अंबेशी लग्न करण्यास नकार दिला. राम व परशुरामाची भेट कोकण प्रदेशाची निर्मितीच्या कथाही तेवढ्याच रंजक आहेत. असे म्हणतात की कोकणाच्या भूप्रदेशाची निर्मिती परशुरामाने समुद्र ४०० योजने मागे हटवून केली आहे. म्हणूनच परशुरामाला सप्त कोकणांचा देव म्हणतात. संपूर्ण भारतात समुद्रालगतच्या राज्यांमध्ये परशुरामाची ही कथा सांगितली आणि ऐकली जाते. त्यामुळे संपूर्ण भारतभर परशुराम क्षेत्रे आहेत. केरळची भूमी परशुरामाने निर्माण केली असे सांगतात.. तिथेही एक परशुराम क्षेत्र आहे. ओरिसा, आसाम, गुजरात आणि पंजाबमध्येही परशुराम क्षेत्र आहे. तसेच ते कोकणातही आहे. परशुराम हा अमर्त्य किंवा चिरंजीव मानला गेला आहे. त्यामुळे त्याचा कायम निवास असतो असा समज आहे. महाराष्ट्रात चिपळूणपासून ४ कि.मी. अंतरावर मुंबई-गोवा हायवेवर एक हजार फूट उंचीचा डोंगर आहे. ह्याला महेंद्रगिरी असे नाव आहे. परशुरामाच्या मंदिरामुळे लगतच्या गावालाही परशुराम किंवा लोटे परशुराम असेच म्हणतात. परशुराम जयंतीच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा www.marathisms.blogspot.com
कुलदैवतेसप्तचिरंजीवमहाभारतातील व्यक्तिरेखाभारतातील प्राचीन ऋषीदशावतार parshuram mantra bhagwan parshuram wallpapers parshuram jayanti parshuram still alive parshuram sena parshuram hills bhagwan parshuram parshuram story in marathi
Subscribe to:
Posts ( Atom )