SMS Category
Home
Mhani in Marathi font (62)
1. अंगात नाही बळ आणि चिमटा घेउन पळ. 2. अंथरूण पाहून पाय पसरावेत. 3. अंधळं दळतं अऩ कुत्र पिठ खातं. 4. अक्कल नाही काडीची नाव सहस्त्रबुद्धे. 5. अक्कल खाती जमा. 6. अक्कल नाही काडीची म्हणे बाबा माझे लग्नं करा. 7. अग अग म्हशी, मला कुठे गं नेशी. 8. अठरा विश्व दारिद्र त्याला छत्तीस कोटी उपाय. 9. अडला हरी गाढवाचे पाय धरी. 10. अडली गाय खाते काय. 11. अडाण्याचा गेला गाड़ा, वाटेवरची शेते काढा. 12. अती झालं अऩ हसू आलं. 13. अती झाले गावचे अन पोट फुगले देवा 14. अती शहाणा त्याचा बैंल रिकामा. 15. अवघड ठिकाणी दुखणे आणि जावई डॉक्टर. 16. असतील मुली तर पेटतील चुली. 17. आंधळीपेक्षा तिरळी बरी. 18. आठ हात लाकुड, नऊ हात धलपी. 19. कर नाही त्याला ड़र कशाला? 20. करायला गेलो एक आणि झाले भलतेच. 21. करावे तसे भरावे. 22. कळते पण वळत नाही. 23. कशात काय अन फाटक्यात पाय. 24. कशात ना मशात, माकड तमाशात. 25. कष्ट करणार त्याला देव देणार. 26. काम ऩ धंदा, हरी गोविंदा. 27. कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच. 28. गंगा वाहते तोवर हात धुवून घ्यावे. 29. गाढवं मेलं ऒझ्याने अन शिगरू मेलं हेलपाट्याने. 30. गुरवाचे लक्ष निविद्यावर (नैवेद्यावर). 31. चव ना ढव म्हणे खंडाळ्या पोटभर जेव. 32. चांदणे चोराला, उन घुबडाला. 33. चांभाराची नजर जोड्यावर. 34. चुकलेला फकीर मशिदीत. 35. चोर तो चोर वर शिरजोर. 36. चोर नाही तर चोराची लंगोटी. 37. चोर सोडून संन्याशाला सुळी. 38. चोराच्या उलट्या बोंबा. 39. चोराच्या मनांत चांदणं. 40. चोराच्या वाटा चोरालाच माहीत. 41. चोरावर मोर. 42. चोरीचा मामला हळू हळू बोंबला. 43. जशास तसे. 44. जशी कामना तशी भावना. 45. जशी देणावळ तशी धुणावळ. 46. जशी नियत तशी बरकत. 47. जसा गुरु तसा चेला. 48. जसा भाव तसा देव. 49. जाईचा डोळा नि आसवांचा मेळा. 50. जातीसाठी खावी माती. 51. जावयाचं पोर हरामखोर. 52. जिकडे पोळी तिकडे गोंडा घोळी. 53. जिकडे सुई तिकडे दोरा. 54. जिच्या घरी ताक तिचे वरती नाक. 55. जेथे पिकतं तिथे विकतं नाही. 56. जो नाक धरी, तो पाद करी. 57. जो श्रमी त्याला काय कमी. 58. ज्याला नाही अक्कल त्याची घरोघरी नक्कल. 59. ज्वारी पेरली तर गहू कसा उगवणार? 60. तवा तापला तोवर भाकरी भाजून घ्यावी. 61. तहान लागल्यावर आड खणणे. 62.ताकापुरते रामायण. www.marathisms.blogspot.com
Marathi Latest Mhani with meaning
16. एका हाताने टाळी वाजत नाही – दोष दोन्हीकडे असतो 17. पालथ्या घड्यावर पाणी – सर्व प्रयत्न निरुपयोगी ठरणे 18. वासरात लंगडी गाय शहाणी – अडाणी लोकात अल्प ज्ञान असणारा शहाणा ठरतो 19. रात्र थोडी सोंगे फार – काम भरपूर, वेळ कमी 22. अति शहाणा त्याचा बैल रिकामा – अति शहाणपणाने नुकसान होते 21. शेरास सव्वाशेर – प्रतिपक्षापेक्षा श्रेष्ठ 22. नाकाचा बाल – अत्यंत प्रिय व्यक्ती 23. नाकापेक्षा मोती जड होणे – डोईजड होणे 24. आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना – दोन्ही बाजूंनी अडचण 25. कामापुरता मामा – काम साधण्यापुरते गोड बोलणे 26. आधी पोटोबा मग विठोबा – अगोदर पोट भरावे मग देवास आळवावे 27. काखेत कळसा गावाला वळसा – वस्तू स्वत:पाशी असून शोधत राहणे 28. झाकली मूठ सव्वा लाखाची – दुर्गुण असले तरी प्रकट करू नयेत 29. पायीची वहाण पायी बरी – योग्यतेप्रमाणे वागवावे 30. मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये – एखाद्याच्या चांगुलपणाचा फार फायदा घेऊ नये 31. उंटावरून शेळ्या हाकणे – आळस, हलगर्जीपणा करणे 32. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही – क्षुद्र माणसांच्या निंदेने थोरांचे नुकसान होत नाही 33. कोल्हा काकडीला राजी – लहान माणसे थोड्या गोष्टीने संतुष्ट होतात 34. गाढवाला गुळाची चव काय – अडाणी, मूर्ख माणसास गुणाचे कौतुक नसते 35. घोडामैदानजवळ असणे – परीक्षा लवकरच होणे 36. डोंगर पोखरून उंदीर कढणे – जास्त श्रम करून कमी फायदा होणे 37. भरंवशाच्या म्हशीला टोणगा – पूर्ण निराशा करणे 38. वरातीमागून घोडे – एखदी गोष्ट झाल्यावर तिची साधने जुळवणे 39. पाण्यात राहून माशाशी वॆर – बलवानाशी शत्रुत्व काय कामाचे ? 40. खायला काळ भुईला भार – ज्याचा काही उपयोग नाही असा माणूस भार बनतो 41. तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे आले – दोन्ही फायदा करून देणाऱ्या गोष्टी मूर्खपणामुळे हातच्या जाणे 42. नाव मोठे लक्षण खोटे – कीर्ती मोठी पण कृती छोटी 43. हपापाचा माल गपापा – लोकांचा तळतळाट करून मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होते 44. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ – आपल्याच हातून आपल्या जातभाईंचे नुकसान होणे 45. गर्जेल तो पडेल काय? – पोकळ बडबडणारा काही करून दखवत नाही 46. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नही – कष्टाशिवाय यश मिळत नाही 47. वारा पाहून पाठ फिरवावी – वातावरण पाहून वागावे 48. कुंपणानेच शेत खाणे – रक्षणकर्त्यानेच नुकसान करणे 49. दगडावरची रेघ- कायमची गोष्ट www.marathisms.blogspot.com
Mhani
अग माझे बायले, सर्व तुला वाटिले.
Mhani
अग अग म्हशी, मला कुठे गं नेशी.
Mhani marathi font
अक्कल ना बक्कल, गावभर नक्कल.
marathi mhani with meaning list language
1. पी हळद हो गोरी – उतावळेपणा दाखविणे 2. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही – प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही 3. बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर – दोनपैकी एक पर्याय निवडणे 4. चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे – प्रत्येकाची वेळ कधीतरी येतेच 5. आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे – अपेक्षेपेक्षा जास्त प्राप्ती होणे 6. उंटावरचा शहाणा – मूर्ख सल्ला देणारा 7. अडला हरी गाढवाचे पाय धरी – अडचणीच्या वेळी मूर्खाचीही मनधरणी करावी लागते 8. नाचता येईना अंगण वाकडे – स्वत:स चांगले काम येत नसणारा दुसऱ्याचे दोष काढतो 9. तोंड दाबून बुक्क्यांचा मार – विनाकारण जुलूम सहन करावा लागणे 10. नावडतीचे मीठ अळणी – नावडत्याने काही चांगले केले तरी आवडत नाही 11. अंथरूण पाहून पाय पसरावे – ऎपत पाहून खर्च करवा 12. छत्तीसाचा आकडा – विरुद्ध मत असणे 13. तेरड्याचा रंग तीन दिवस – एखादे कार्य थोडे दिवस जोरात चालून एकदम बंद पडणे 14. दुष्काळात तेरावा महिना – संकटात अधिक भर 15. नव्याचे नऊ दिवस – नवेपणा असतानाचे कौतुक नंतर टिकत नही - See more at: http://www.marathiquotes.com/marathi-mhani-with-meaning/#sthash.LpptynWx.dpuf www.marathisms.blogspot.com
marathi mhani in marathi language
1) नाजुक मानेला मोबाईलचा आधार 2) मनोरंजन नको रिंगटोन आवर 3) स्क्रिनपेक्षा एस एम एस मोठा 4) जागा लहान फ़र्निचर महान
मराठी म्हणी new marathi mhani
1) मुलं करतात चॅनेल सर्फ़, आईबाप करतात होमवर्क 2) चुकली मुलं सायबरकॅफ़ेत 3) चुकल्या मुली ब्युटीपार्लरमध्ये 4) ज्या गावचे बार, त्याच गावचे हवालदार
marathi mhani funny
1) राहायला नाही घर म्हणे लग्न कर 2) सासु क्लबमध्ये सुन पबमध्ये 3) वंशाला हवा दिवा, ह म्हणते ईश्श तिकडे जावा 4) खिशात नाही डोनेशन, घ्यायला चालला ऍडमिशन
Subscribe to:
Posts ( Atom )