SMS Category
Home
marathi mhani with meaning list language
1. पी हळद हो गोरी – उतावळेपणा दाखविणे 2. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही – प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही 3. बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर – दोनपैकी एक पर्याय निवडणे 4. चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे – प्रत्येकाची वेळ कधीतरी येतेच 5. आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे – अपेक्षेपेक्षा जास्त प्राप्ती होणे 6. उंटावरचा शहाणा – मूर्ख सल्ला देणारा 7. अडला हरी गाढवाचे पाय धरी – अडचणीच्या वेळी मूर्खाचीही मनधरणी करावी लागते 8. नाचता येईना अंगण वाकडे – स्वत:स चांगले काम येत नसणारा दुसऱ्याचे दोष काढतो 9. तोंड दाबून बुक्क्यांचा मार – विनाकारण जुलूम सहन करावा लागणे 10. नावडतीचे मीठ अळणी – नावडत्याने काही चांगले केले तरी आवडत नाही 11. अंथरूण पाहून पाय पसरावे – ऎपत पाहून खर्च करवा 12. छत्तीसाचा आकडा – विरुद्ध मत असणे 13. तेरड्याचा रंग तीन दिवस – एखादे कार्य थोडे दिवस जोरात चालून एकदम बंद पडणे 14. दुष्काळात तेरावा महिना – संकटात अधिक भर 15. नव्याचे नऊ दिवस – नवेपणा असतानाचे कौतुक नंतर टिकत नही - See more at: http://www.marathiquotes.com/marathi-mhani-with-meaning/#sthash.LpptynWx.dpuf www.marathisms.blogspot.com
Mhani