SMS Category
Home
Mhani in Marathi font (62)
1. अंगात नाही बळ आणि चिमटा घेउन पळ. 2. अंथरूण पाहून पाय पसरावेत. 3. अंधळं दळतं अऩ कुत्र पिठ खातं. 4. अक्कल नाही काडीची नाव सहस्त्रबुद्धे. 5. अक्कल खाती जमा. 6. अक्कल नाही काडीची म्हणे बाबा माझे लग्नं करा. 7. अग अग म्हशी, मला कुठे गं नेशी. 8. अठरा विश्व दारिद्र त्याला छत्तीस कोटी उपाय. 9. अडला हरी गाढवाचे पाय धरी. 10. अडली गाय खाते काय. 11. अडाण्याचा गेला गाड़ा, वाटेवरची शेते काढा. 12. अती झालं अऩ हसू आलं. 13. अती झाले गावचे अन पोट फुगले देवा 14. अती शहाणा त्याचा बैंल रिकामा. 15. अवघड ठिकाणी दुखणे आणि जावई डॉक्टर. 16. असतील मुली तर पेटतील चुली. 17. आंधळीपेक्षा तिरळी बरी. 18. आठ हात लाकुड, नऊ हात धलपी. 19. कर नाही त्याला ड़र कशाला? 20. करायला गेलो एक आणि झाले भलतेच. 21. करावे तसे भरावे. 22. कळते पण वळत नाही. 23. कशात काय अन फाटक्यात पाय. 24. कशात ना मशात, माकड तमाशात. 25. कष्ट करणार त्याला देव देणार. 26. काम ऩ धंदा, हरी गोविंदा. 27. कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच. 28. गंगा वाहते तोवर हात धुवून घ्यावे. 29. गाढवं मेलं ऒझ्याने अन शिगरू मेलं हेलपाट्याने. 30. गुरवाचे लक्ष निविद्यावर (नैवेद्यावर). 31. चव ना ढव म्हणे खंडाळ्या पोटभर जेव. 32. चांदणे चोराला, उन घुबडाला. 33. चांभाराची नजर जोड्यावर. 34. चुकलेला फकीर मशिदीत. 35. चोर तो चोर वर शिरजोर. 36. चोर नाही तर चोराची लंगोटी. 37. चोर सोडून संन्याशाला सुळी. 38. चोराच्या उलट्या बोंबा. 39. चोराच्या मनांत चांदणं. 40. चोराच्या वाटा चोरालाच माहीत. 41. चोरावर मोर. 42. चोरीचा मामला हळू हळू बोंबला. 43. जशास तसे. 44. जशी कामना तशी भावना. 45. जशी देणावळ तशी धुणावळ. 46. जशी नियत तशी बरकत. 47. जसा गुरु तसा चेला. 48. जसा भाव तसा देव. 49. जाईचा डोळा नि आसवांचा मेळा. 50. जातीसाठी खावी माती. 51. जावयाचं पोर हरामखोर. 52. जिकडे पोळी तिकडे गोंडा घोळी. 53. जिकडे सुई तिकडे दोरा. 54. जिच्या घरी ताक तिचे वरती नाक. 55. जेथे पिकतं तिथे विकतं नाही. 56. जो नाक धरी, तो पाद करी. 57. जो श्रमी त्याला काय कमी. 58. ज्याला नाही अक्कल त्याची घरोघरी नक्कल. 59. ज्वारी पेरली तर गहू कसा उगवणार? 60. तवा तापला तोवर भाकरी भाजून घ्यावी. 61. तहान लागल्यावर आड खणणे. 62.ताकापुरते रामायण. www.marathisms.blogspot.com
Mhani