SMS Category
Home
maha shivaratri pooja vidhi in marathi
शिवलिंगावर या 10 पूजन सामग्रीने अभिषेक केल्यास होतील हे 10 लाभ महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी येथे एक खास उपाय सांगत आहोत. या उपायानुसार शिवलिंगावर दहा पूजन सामग्रीने अभिषेक करावा. येथे जाणून घ्या, या दहा गोष्टी कोणकोणत्या असून यापासून कोणते लाभ प्राप्त होतात. या आहेत दहा पूजन सामग्री 1. जल, 2. दूध, 3. दही, 4. मध, 5.तूप, 6.साखर, 7. अत्तर, 8. चंदन, 9. केशर, 10. भांग (विजया औषधी) ही सर्व सामग्री एकत्र करून किंवा एक-एक सामग्रीने महादेवाला अभिषेक करू शकता. शिवपुराणानुसार या सामग्रीने शिवलिंगाला अभिषेक केल्यास भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. अभिषेक करताना ऊँ नम: शिवाय मंत्राचा जप अवश्य करावा. 2- मध अर्पण केल्यास वाणी मधुर होते. 3- दुध अर्पण केल्याने आरोग्य उत्तम राहते. 4- दही अर्पण केल्याने स्वभाव गंभीर होतो. 5- शिवलिंगावर तूप अर्पण केल्याने आपली शक्ती वाढते. 6- अत्तराने अभिषेक केल्यास विचार पवित्र होतात. 7- महादेवाला चंदन अर्पण केल्याने आपले व्यक्तिमत्व आकर्षक होते. समाजात मान-सन्मान प्राप्त होतो. 8- केशर अर्पण केल्याने सौम्यता प्राप्त होते. 9- भांग अर्पण केल्याने आपल्यातील विकार आणि वाईट गोष्टी दूर होतात. 10- साखर अर्पण केल्याने सुख-समृद्धी वाढते. www.marathisms.blogspot.com
Mahashivratri