SMS Category
Home
marathi social message
लग्नात आपण वधु-वरांच्या डोक्यावर तांदुळ टाकत असतो. पण मंडळी, आपण टाकलेल्या अक्षता पैकी किती अक्षता त्या वधु- वरांच्या डोक्यावर पडतात ? १०% सुध्दा नाही. लग्न छान पार पडतं, लग्नाच्या हॉलमधून बाहेर येताना बहुतेकजण डोक्यावर हात फिरवून आपल्या केसांमधील अक्षता काढतात. सगळी मंडळी गेल्यावर पूर्ण हॉलभर राहतो तांदळाचा सडा... तोही लोकांनी पायानी तुडविलेला... आपल्या अस म्हटलं जातं कि “अन्न हे पुर्ण ब्रम्ह”. असे अन्न वाया घालवून व पायदळी तुडवून आपण अन्नाचा अपमान करीत नाही का ? एका लग्नामध्ये सुमारे ५ किलो तांदळाच्या अक्षता केल्या जातात. एकट्या महाराष्ट्रात दरवर्षी अंदाजे ४ लाख लग्न होतात म्हणजे सरासरी २० लाख किलो तांदुळ आपण व्यर्थ वाया घालवितो. एकीकडे जव्हार- मोखाडा येथे लहान मुलं अन्न नाही म्हणून कुपोषित होताहेत आणि आपण सहज लाखो किलो अन्नाची नासाडी करतो. तुम्ही म्हणाल की तांदुळ नाही टाकायचे तर टाकायचे तरी काय ? १३५ वर्षापूर्वी महात्मा फुले यांनी लग्नाला तांदळा ऐवजी फुलं वापरण्याचा विचार मांडला होता. एकतर फुलं आपण खात नाही, सगळेजण फुले वापरायला लागल्यावर २० लाख किलो फुलांच मार्केट तयार होईल, शेतकर्यानला, कष्टकर्या ला काम व पैसा मिळेल.
Social sms