SMS Category
Home
shivaji maharaj jayanti speech in marathi
मराठे व मुघल हा सत्ता संघर्ष होता. हे काही धर्म युद्ध नव्हते. मुघलांच्या पदरी मिर्झाराजे जयसिंग यांच्या सारखे बरेच हिंदू सरदार होते. तसेच मराठ्यांच्या सैन्यात ही मुसलमान सैनिक होते. मग ते धर्म युद्धात का नाही सामिल झाले का ते हिंदू देवळात जाणारे नव्हते की ते मुसलमान नमाज पढनारे नव्हते. साधी गोष्ट आहे मराठ्यांच्या सैनिकातील मुसलमान अन्याया विरुद्ध होते सत्या सोबत होते अन मुघलांच्या पदरी असणारे हिंदू सरदार मंडलीक होते वतनदार होते. पण इथे स्वराज्य हे सर्व जाती धर्माचे होते ते फक्त हिंदूचे नव्हे छे छे खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांचे सुद्धा नव्हते. म्हणून आज जगात त्यांचा आज ही आदराने उल्लेख केला जातो. औरंग्याने संभाजी महाराजांच्या कैदेत केलेल्या मागण्या आज ही स्पष्ट आहेत तरी ही काही अति धर्म उत्साही त्याचा संबध धर्माशी जोडून आज ही संभाजीराजेन एक प्रकारे अन्याय करत आहेत कारण त्यांच्या डोळ्यावर धर्माची पट्टी बांधलेली आहे. सर्व गड कोटांच्या चाव्या माझ्या ताब्यात दे आणि स्वराज्याचा खजिना माझ्या हवाली कर आणि तुला माझ्या मधील मदत करणार्या सरदारांची नावे सांग कारण औरंग्या स्वत:च्या सावलीवर सुद्धा विश्वास ठेवत नव्हता तो खुप संशयी होता म्हणून त्याचा समज होता की काही मुघल सरदार मदत करत आहेत. हे साध्या मागण्या औरंग्याने केलेल्या आज आम्हाला ३५० वर्षानंतर सुद्धा आम्हाला कळाल्या नाहित हे आमचा केवढा मोठा ‘पराक्रम’ आहे. स्वत:च्या भावांचा कपटाने खून करणारा औरंग्या एवढा वेडा नक्कीच नसेल की धर्मांतर कर मग मी तुला सोडतो असे संभाजी महाराजांना म्हणायला कारण त्याने स्वत: लिहून ठेवले आहे की, शहाजींना सोडले म्हणून शिवाजीराजे वरचढ झाले अन शिवाजीराजे आग्राहुन निसटले अन संभाजीराजे नावाचे संकट माझ्या जीवनात आले. तेव्हाच त्यांचे काटे काढले असते तर हे दिवस आले नसते. त्यामुळे औरंग्या खुद्द त्याचा खुदा जरी समोर आला असता अन संभाजी राजेंना सोड म्हणाला असता तरी त्याने सोडले नसते ही काळ्या दगडावरची रेघ आहे. मित्रांनो मी कोणत्याही संघटनेचा नाही माझे विचार मी कोणत्याच संघटनेच्या वळचनीला बांधनारा मराठा नाही मी माझा स्वतंत्र आहे पण सत्य समोर यावे म्हणून हा प्रपंच आहे. संभाजी राजेंना न्याय मिळावा हीच माफक अपेक्षा बाकी आपन सुज्ञ आहात. जय जिजाऊ. www.marathisms.blogspot.com
Sambhaji Raje