SMS Category
Home
shivaji maharaj sword history
आज १९ फेब्रुवारी तारखेनुसार.. शिवजयंती !!! तमाम शिवप्रेमींना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!! छत्रपती शिवजी महाराजांच्या हातात जी तलवार होती तीच तलवार म्हणे शिवरायांना आई भवानी ने दिली ?? शिवरायांना कोणी देवी बिवी प्रसन्न झाली वरदान दिले या इतिहासात मारलेलेल निव्वळ थापा आहेत ... शिवाजी महाराज एक नैसर्गिक रुपातच कर्ते पुरुष होते त्यांना असल्या वरदान बारदानाची अजिबात गरज नव्हती म्हणुनच प्रबोधनकार ठाकरे म्हणतात ,"छत्रपती शिवरायांचे नाव घेतलल्यावर हिंदूच्या ३३ कोटी देवांची फलटन बाद होते." पण त्यांनी इतिहासातुन थापा मारल्या आणि आम्ही गपगुमान पचविल्या... तलवारीचा खरा इतिहास असा......~~~~> दिनांक ५ मार्च १६५९ रोजी महाराज वाडीचे सावंत यांच्या सोबतीने कुडाळला आले होते , तेथे पोर्तुगाल मध्ये तयार करण्यात आलेली हि तलवार युरोपियन व्यापाऱ्याने विक्रीस ठेवली होती. या तलवारीची खासियत शिवाजी महाराजांनी अचूकतेने जाणली. ती तलवार वजनाने हलकी पण किमतीने बरीच वजनदार होती. ती न गंजणाऱ्या विशेष धातूने बनविली होती .तिचे पाते पातळ असूनही विशेष अश्या न मोडणाऱ्या विशिष्ट पोलादाने बनविण्यात आले होते .. अशी हि आधुनिक तलवार हिरेजडीत मुठ आणि सोन्याच्या धातूत तयार केली असल्यामुळे आणखीनच मौल्यवान होती याशिवाय तलवारीची धार अफलातून होती तलवारीच्या समोर येणारा क्षणातच आपला प्राण गमाविल अश्या धाटणीची . महाराजांना गनिमांना संपवायचे होते येथे रजेचे राज्य उभारायचे होते त्यासाठी महाराजांना अशी वजनाने हलकी ,धारेने तेज आणि न मोडणारी सपसप वार करू शकेल अशा तलवारीची महाराजांनी खूप गरज होती त्यावेळी महाराजांनी ती तलवार रोखीने ३०० होणांमध्ये खरेदी केली .(३००होन = त्यावेळचे एक हजार पन्नास रुपये ) शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा कारभार करताना हिशोब ठेवण्यात अगदी चोख असत याचे उत्तम उदाहरण म्हणजे महाराजांनी ३०० होण मोजून विकत घेतलेली तलवार , तिची नोंद शिवाजी महाराजांच्या दफ्तर खाण्यात करण्यात आली असून कीर्द खाते ( इन्कम & एक्स्पेंडीचर अकौंट ) मध्ये खर्चाच्या कॉलममध्ये नोंद करून महाराजांनी या तलवारीबाबाद गोंधळ माजू नये , भाकड कथा रचल्या जाऊ नये यासाठी प्रबंध करून ठेवला आहे....... आजही आपण शिवप्रेमी जर खोट्यानाट्या इतिहासावर विश्वास ठेवून चालत असतील आणि शिव्ध्रोही भूमिका घेत असतील तर हा शिवाजी महाराजांचा.. त्यांनी मिळविलेल्या स्वराज्याचा..... त्यांनी रयतेसाठी प्राणपणाने गाजविलेल्या शौर्याचा आपमान आहे . शिवजयंती हा उत्सव म्हणून साजरा करू नका तर प्रबोधनाचा कार्यक्रम करून साजरा करा कारण शिवाजी महाराजांच्या इतिहासात स्वार्थी संधीसाधुनी सगळ्यात जास्त घुसखोरी करून खोटा इतिहास लिहिला आहे .... याला कारण "इतिहास घडविला आपल्या महापुरुषांनी पण लिहिला धर्मांध विदुषकांनी......" पुनश्च: एकदा शिव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा www.marathisms.blogspot.com
Shivaji Maharaj