SMS Category
Home
funny kavita in marathi
दमलेल्या बाबाची जर एक कहाणी असू शकते तर सुटलेल्या ढेरीचीही असू शकते !! so here it goes... तळलेली खरपूस एक भजी राणी! चटणीच्या संगे आणी तोंडामध्ये पाणी !! रोजचेच आहे सारे, आज नवे काही नाही, माफी कशी मागू आज तोंड बंद नाही!! एकाच घासात भजी खातो मी खुषीत, त्यावरी कटींगही मारीन बशीत!! सांगायाचे आहे माझ्या बटाट्या वड्या! सुटलेल्या पोटाचीही कहाणी तुला!! ला लाला ला ला ला लाला ला ला!! आटपाट नगरात खादाड मी भारी! सकाळच्या चहामध्ये पाव आणि खारी!! रोज सकाळीच मी स्वत:शी बोले! मिसळ हाणायाचे आज राहूनच गेले!! जमलेच नाही जाणे काल मला जरी! आज तरी ठुसणार भाजी आणि पुरी!! भैय्याच्याही गाडीवर मारून मी फेरी! नासलेल्या पाण्यातली खाई पाणीपुरी!! मळक्या हातांचा भैय्या आवडे मला! सुटलेल्या पोटाचीही कहाणी तुला!! ला लाला ला ला ला लाला ला ला!! आँफिसात दिसभर असतो बसून! फिरणारी खूर्ची झेली देहाचे वजन! तास तास जातो लंच ब्रेकची वाट बघून, एक एक पाकीट संपे वेफर्स गट्टम! अशा वेळी काय सांगू काय काय वाटे, आतडी पिळवटी, वात आत दाटे !! वाटते की उठुनिया दोन पावले फिरावे, किती भरू पोटामध्ये आता नको व्हावे उगाचच चालावे नी भांडावे स्वतःशी, भरलेला मैदा येऊ पाहे गळ्य़ाशी उधळत, खिदळत, धावणार कधी? वजनाचे वाजले बारा, कमी होणार कधी?? हासुनिया उगाचच ओरडेल आता, गर्रकन फिरणारा वजनाचा काटा तरी सुद्धा दोघे जण दंगा मांडू असा, क्षणा क्षणावर ठेवू खादाडीचा ठसा। सांगायाचे आहे माझ्या बटाट्या वड्या! वाढलेल्या वजनाची कहाणी तुला!! ला लाला ला ला ला लाला ला ला!! www.marathisms.blogspot.com
marathisms.blogspot.com
Funny Kavita