SMS Category
Home
jagtik mahila din marathi sms
एक स्त्री आमचा विकास तर झालाच आहे. पण सर्वांगीण नाही. समाजाचा काही वर्ग खूप पुढे निघून गेला आहे. परंतु, काही वर्ग मागेच आहे. त्याचा विकास झाला नाही. अजूनही अनेक स्त्रिया अशिक्षित, अंधश्रद्धा, पतीची मारहाण, हुंडा अशा अनेक गोष्टींच्या बंधनात अडकलेल्या आहे. त्यांना परिवर्तनाची दिशा मिळालीच नाहीये. त्यांचा दिवस कोंबडं आरवण्याच्या आधी सुरू होतो आणि रात्रीच्या किरकिर होता संपतो. अजूनही त्या दोन वेळेची भूक भागवण्यासाठी 'ठेविले अनंते तैसिची राहावे' असे म्हणत नवर्याची मारहाण सहन करण्यात अख्खं आयुष्य घालवत असतात. पण या आरशाची एक बाजू फारच सुंदर आहे तर दुसरी तेवढीच कुरूप. ह्या दिवशी दहा मिनिटं थांबून जर विचार केला तर आपल्याला आत्मग्लानीच होईल, की आपण फक्त आपलाच विचार केला आहे. दुसर्याच्या नाही. आणि याची परिभाषा विकास आहे. तर तो फक्त स्व:विकासच आहे. सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा... www.marathisms.blogspot.com
Women's day