SMS Category
Home
marathi antique sms
काही अनुत्तरीत प्रश्न : १] मराठी पेपरच्या रद्दीचा भाव इंग्लिश पेपर पेक्षा कमी का? २] एशियाड मधील प्रवासी एसटीतल्या प्रवाशांकडे कुत्सित नजरेने का बघतात? ३] तांबडा सिग्नल असतानाही आपल्या मागचा वाहचालक होर्न का वाजवतो? ४] लहान बाळांशी मोठी लोकं बोबडे का बोलतात? ५] उडप्याच्या हॉटेलमध्ये कांदा भजी का मिळत नाही? ६] बशीत ओतून चहा पिणाऱ्या माणसाला वेडा असल्यासारखे का पाहतात? ७] 'मीच म्हणून तुमच्याशी संसार केला' असे प्रत्येक बाई आपल्या नवऱ्याला का म्हणते? ८] आपण हॉटेलात बसल्यावर तिथला पोरगा नेमकी आपल्या बाकाखालची फरशी पुसायला का येतो? ९] हॉटेलात इडली सांबारातली शेवग्याची शेंग चमच्याने कशी खायची? १०] अज्ञानात सुख असते असे म्हणतात मग माणूस ज्ञान मिळवण्यासाठी का धडपडतो? ११] कॉम्पुटर बंद करण्यासाठी स्टार्ट बटन का क्लिक करावे लागते? १२] दोन शेजारणी खूप काम पडलंय अस म्हणत दारात उभा राहून अर्धा अर्धा तास का बोलत असतात? १३] जाहिरातीत दाढी केल्यानंतर गालावर हात फिरायला बाईचं का लागते? १४] अनुभवी डॉक्टर सुद्धा practice का करतात? १५] आपला जन्म इतरांसाठी झाला असेल तर इतर लोक कशासाठी जन्मले आहेत? www.marathisms.blogspot.com
antique