SMS Category
Home
Ram navami vrat vidhi katha information details in Marathi
श्रीराम नवमीचं व्रत... भारतीय संस्कृतीत हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. रामनवमीचे एक व्रतही आहे. पाहुयात कसं करतात हे व्रत... • व्रताच्या एक दिवस अगोदर सकाळीच लवकर स्नान आटोपून श्रीरामाचे नामस्मरण करावे. • दुसऱ्याच दिवशी (चैत्र शुक्ल नवमीला) ब्रह्म मुहर्तात ऊठून घर स्वच्छ करावे आणि आपले दैनंदिन कार्यक्रम लवकर उरकून घ्यावेत. • त्यानंतर गोमूत्र, शुद्ध पाणी घरात शिंपडून घर पवित्र करावे. • `उपोष्य नवमी त्व यामेष्वष्टसु राघव| तेन प्रीतो भव त्वं भो संसारात् त्राहि मां हरे|` या मंत्राने ईश्वराप्रती व्रत भावना प्रकट करावी. • त्यानंतर, `मम भगवत्प्रीतिकामनया (वामुकफलप्राप्तिकामनया) रामजयंतीव्रतमहं करिष्ये` हा संकल्प करून काम- क्रोध-लाभ आणि मोहापासून अलिप्त होऊन व्रत करावे. • मंदिर किंवा घराला तोरण आणि पताका लावून सुशोभित करावे. • घराच्या उत्तर भागात रंगीत मंडप टाकून त्यात सर्वतोभद्रमंडलाची रचना करून त्याच्या मध्यभागी विधीपूर्वक कलश स्थापन करावा. • कलशावर रामपंचायतन (त्यामध्ये राम-सीता, दोन्ही बाजूला भरत आणि शत्रुघ्न, लक्ष्मण आणि पदचरणी हनुमानाच्या सोन्याच्या मूर्ती किंवा चित्राची प्रतिष्ठापना करावी आणि त्यांची पूजा करावी. • त्यानंतर विधीपूर्वक संपूर्ण पूजा करा. मंत्र आणि त्याचा अर्थ `श्रीराम जय राम जय जय राम` www.marathisms.blogspot.com
Ram Navami