SMS Category
Home
skin care beauty Ayurvedic tips in marathi
1.लिंबू - अर्धे लिंबू घेऊन दररोज त्वचेवर रगडा. हे एक ब्लिचिंग एजंट असून, यापासून घरीच तुम्ही त्वचेची निगा राखू शकता. 2.बटाटा - बटाट्याचा रस काढून दररोज त्वचेवर लावल्यास थोड्यास दिवसात फरक जाणवू लागेल. 3.टोमॅटो - टोमॅटोमधील गर काढून चेहरा आणि गळ्यावर लावा. या उपायाने तच स्वच्छ होईल. 4.मध - अर्धा चाचा मध घेऊन त्यामध्ये चिमुटभर दालचिनी टाकून हे मिश्रण चेहर्यावर लावा. थोड्यावेळाने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. 6.दही- चेहर्यावर दही लावून थोड्यावेळाने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. या उपायाने रंग उजळेल. 5.काकडीचा रस - काकडीचा रस काढून चेहर्यावर व त्वचेवर लावा. ऑयली (तेलकट) त्वचेसाठी हा उत्तम उपाय आहे. 7.नारळ पाणी - चेहर्यावर नारळ पाणी लावल्यास काळे डाग नष्ट होतील. 8.बदाम तेल- त्वचेवर बदाम तेलाने मालिश करा. अर्ध्या तासानंतर त्वचा स्वच्छ धुवून घ्या. या तेलामध्ये तुम्ही केशर टाकू शकता. या उपायाने चेहरा उजळ होईल. 9.पपई - मध, दुध, पपई आणि दुध पावडर एकत्र करून हे मिश्रण चेहर्यावर लावल्यास चेहर्यावरील सुरकुत्या नष्ट होतील.। 10.चंदन पावडर - बदाम तेलात चंदन पावडर मिसळून त्वचेवर लावल्यास त्वचा हेल्दी होईल. www.marathisms.blogspot.com
marathisms.blogspot.com
Ayurvedic