SMS Category
Home
प्रेमामध्ये अपयश मिळाल्यानंतर काय करावे?
‘देवदास’ न होण्यासाठी…. * सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही स्वत:ला कमी समजण्याची गल्लत करू नका. मनातील न्यूनगंड आधी झटका. * हताश न होता चेहर्यावर नेहमी हास्य ठेवा. तुम्हाला ब्रेकअपचे दु:ख नक्की झाले असेल मात्र ते अशा पद्धतीने लपवा की, त्याचा सुगावा कुणालाही लागता कामा नये. * दिवसभरातील काही वेळ स्वत:साठी राखून ठेवा व त्यात आपण आपल्या आयुष्यातले सुवर्णक्षण गमावले आहे. त्यावर आत्मपरिक्षण करा. * अशा परिस्थितीत मित्र व परिवारातील सदस्यांची सोबत खूप महत्त्वाची असते. * तुम्ही नोकरी करत असाल तर काही दिवसांची सुटी घेऊन बाहेरगावी फिरायला निघून जा. * अशा वेळी स्वत:ला अशा छंदामध्ये गुंतवून जा की, तुम्हाला तो छंद जोपासण्याची मनापासून इच्छा आहे. www.marathisms.blogspot.com
Love Tips