SMS Category
Home
gad aala pan sinha gela story in Marathi Battle of Sinhagad सिंहगडाची लढाई गड आला पण सिंह गेला Tanaji Malusare Jayanti Special
सिंहगडाची लढाई ही मराठी इतिहासात एक अतिशय रोमांचक क्षण आहे. शिवाजी महाराजांच्या महत्वाच्या घडामोडीत सिंहगडाची लढाई महत्त्वाची मानली जाते. या लढाईवरती अनेक लेख, अनेक गोष्टी, अनेक नाटकांमध्ये अनेक जणांनी आपपल्या परिने खुलवून सांगितल्या लिहिल्या इतक्या की कालांतराने त्या गोष्टी समाजमान्य झाल्या व त्या आख्यायिका बनल्या. त्यातील काही अख्यायिका खालील प्रमाणे. तानाजी आपल्या मुलाचे लग्नाचे आमंत्रण शिवाजी महाराजांना देण्यास गेले असताना. शिवाजी महाराजांनी सिंहगडा ताब्यात घेण्याचा विचार सांगितला. परंतु तानाजीच्या घरी लग्न असल्याने शिवाजी महाराज बेत बदलणार होते. तानाजीने स्वतःहून प्रेरित होऊन शिवाजींना या लढाईचे नेतृत्व त्याला देण्यास सांगितले. तानाजी जिवंत असेपर्यंत शिवाजींना या मोहिमेवर जाण्याची गरज नाही. तानाजीने पहिले कोंढाण्याची मोहिम फत्ते करायची मगच मुलाचे लग्न करायचे. आधी लगीन कोंढाण्याचे, मगच रायबाचे असे तानाजीचे उद्गगार प्रसिद्ध आहे. तानाजीने कडा चढण्यासाठी एका यशवंती नावाच्या घोरपडीला दोर लावला व तिला कडा वर चढून जाण्यास सांगितले व या दोराचा वापर करून मावळे कडा चढून गेले. गड मराठ्यांच्या हातात पडल्यानंतर मावळ्यांनी किल्यावर मोठा जाळ करून राजगडावर शिवाजी महाराजांना किल्ला जिंकल्याचा संकेत पाठवला. शिवाजी महाराजांना जेव्हा कळले की तानाजी मालुसरे या युद्धात कामी आला तेव्हा महाराजांना याचे अतिव दु:ख झाले. व त्याच्या तोंडातून वाक्य बाहेर पडले गड आला पण सिंह गेला. व त्यानंतर या गडाचे नाव कोंढाणावरून सिंहगड असे बदलले. या सिंहाच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा www.marathisms.blogspot.com
Tanaji Malusare