SMS Category
Home
sai baba biography information in marathi mahiti शिर्डी साईबाबा
साईबाबा हे 'शिर्डीचे साईबाबा' म्हणून सर्व जगाला ज्ञात आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील शिर्डी हे गांव साईबाबांच्या वास्तव्यामुळे जागतिक कीर्तीचे तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता पावले आहे. बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी देश विदेशातील लोक येथे येतात. तथाकथित अलौकिक शक्ती प्राप्त असलेले साईबाबा शिर्डीत आले आणि जवळजवळ ६० वर्षे त्यांनी आपल्या मानवी देहातील जीवनकार्य पूर्ण केले व ते तेथेच समाधिस्त झाले. देहत्यागानंतर माझी हाडे समाधीतून बोलतील व या ठिकाणी माणसांची रीघ लागेल, असे.साईबाबांनी मृत्यूपूर्वी आपल्या भक्तांना सांगितले होते, असे म्हणतात. याचा प्रत्यय आजही अनेकांना येतो आहे. येथूनच बाबांनी सर्व जगाला श्रद्धा व सबुरी हा महामंत्र दिला. शिर्डीस आल्यावर प्राप्त होणारी मनःशांती व मिळणारा आत्मविश्वास यामुळे शिर्डी हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. साईबाबा यांनी शिर्डीत आल्यानंतर आपली जात कधीही कुणाला सांगितली नाही, पण ते मुस्लिम असावेत. साईबाबांसाठी सर्व लोक समान होते. त्यांनी धर्मनिरपेक्षतेची शिकवण दिली.“सबका मालिक एक” हे साईंचे बोल होते. १५ ऑक्टोबर १९१८ रोजी दसऱ्याच्या दिवशी साईबाबांनी मानवी देहाचा त्याग केला. www.marathisms.blogspot.com
Sai Baba