SMS Category
Home
Sant rohidas ravidas maharaj biography history wiki essay nibandh Marathi गुरु संत रविदास महाराज
संत कबीर आणि गुरूनानक हे संतगुरू रविदासांचे समकालीन होते. ते संत रविदासांना मोठे बंधू मानायचे. संत रविदासांनी स्वतः उभे राहून समाजातील विषमतेच्या अन्याय, अत्याचार आणि शोषणाच्या विरोधात बंड पुकारले. आपल्या अमृतवाणीने संपूर्ण भारत जागा केला. ज्ञानविज्ञान प्रबोधन केले. समतेचा संदेश दिला. संत रविदास हे बुध्द आणि कबीर यांच्या परंपरेतील महान व्यक्तिमत्त्व आहे. संत कबीर आणि गुरूनानक हे संतगुरू रविदासांचे समकालीन होते. ते संत रविदासांना मोठे बंधू मानायचे. त्यांना जवळजवळ १८१ वर्षांचे उदंड आयुष्य लाभले. गुरु रविदासांच्या उपलब्ध साहित्यामध्ये ४१ साखीयॉं, १७७ पद आणि यावर दीडशे – दोनशे ओव्यांची रचना आहे. तीनशे साडेतीनशे वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या शीख धर्माच्या ‘गुरूग्रंथ साहिब’ या धर्मग्रंथामध्ये संकलक अर्जुनदेव यांनी इ. स. १६०४ मध्ये संतगुरू रविदासांची ४० पदे व १ श्लोक अंतर्भूत केली आहेत. अशाप्रकारे मोजकेच लिखाण, साहित्य संशोधकाच्या हाती लागले आहे. यावरून रोहिदासांच्या साहित्याचा फार मोठया प्रमाणात विध्वंस झाला असावा याची खात्री पटते. गुरु रविदास यांचा जन्म अस्पृश्य जाती झाल्याने त्यांच्या साहित्यांची काय गत केली असेल याची कल्पनाच न केलेली बरी. तरीही अस्पृश्य समाजात जन्मलेल्या या संतांच्या विचाराला भट ब्राम्हण संपवू शकले नाहीत. सामाजिक क्रांतीचे प्रणेते संतगुरू रविदास भारतभूमी ही महान साधूसंतांच्या आणि क्रांतिकारक महापुरूषांच्या कार्याने पवित्र झालेली आहे. कुठलेही राष्ट्र जिवंत ठेवायचे असेल तर त्याला माणसाचा समूह, संताचा सहवास आवश्यकच आहे. संत सहवासाशिवाय, समाजाच्या एकतेशिवाय राष्ट्र नसते. माणसामध्ये माणुसकीची भावना असेल तर सुसंस्कारातून आदर्श संस्कृतीचा जन्म होण्यास वेळ लागत नाही. एकत्रित एकसंध समाजाचे किंवा संत विचाराचे तत्त्व समतेचे, ममतेचे असते. त्यांनी सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक परिस्थितीचे भान ठेवून कृतिशील तत्वचिंतन केलेले असते. न्याय, नीती आणि मानवता या शाश्वत तत्वांची जाणीव आपल्या विचारकार्यातून करीत असतात. अशाच संताचे नाव जगात अजरामर होते. प्रेरणादायक ठरते. दिशादर्शक असते त्यापैकीच संत गुरु रविदास एक होते. www.marathisms.blogspot.com
Sant Ravidas