SMS Category
Home
saksharta divas in marathi informtion slogan essay speech साक्षरता दिवस
लोकांपर्यंत पोहोचलेली साक्षरता साजरी करण्यासाठी आणि आजही निरक्षर असलेल्यांसाठी प्रयत्न करण्याची आठवण म्हणून १९६६ पासून दरवर्षी ८ सप्टेंबरला 'आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस' पाळला जातो.ज्या निरक्षरांना साक्षर बनवण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर साहित्य तयार झालं त्या प्रौढ निरक्षरांची भाषा, त्यांच्या बोली साक्षरता साहित्यात दिसल्या नाहीत. निरक्षरांच्या भाषेची नाळ साक्षरता साहित्याशी फारशी न जुळणं, हे भारतातल्या साक्षरता चळवळीच्या अगदी मर्यादित यशाचं एक महत्त्वाचं कारण आहे. एखाद्या योजनेच्या लाभाथीर्ंच्या सांस्कृतिक वातावरणाची, त्यातल्या बहुविधतेची जाणीव न ठेवता राबवली गेलेली कोणतीही योजना यशस्वी ठरत नाही. शिकणाऱ्यांच्या सांस्कृतिक पर्यावरणाचा विचार न करता आखलेली अक्षरज्ञान 'देण्याची' योजना फारशी यशस्वी ठरली नाही यात नवल ते काय? साक्षरतेतून स्त्रियाचं सक्षमीकरण होतं यात शंका नाही. साक्षरता अन् औपचारिक शिक्षण या दोन्ही ठिकाणी 'स्त्री शिकली की कुटुंब शिकेल' ही घोषणा स्वातंत्र्यपूर्व काळापासून दिली जातेय. पुरुषांचं शिक्षण किंवा साक्षरता त्यांच्या वैयक्तिक प्रगतीसाठी असते, पण स्त्रीवर मात्र कुटुंबाच्या साक्षरता-शिक्षणाची जबाबदारी धोरणात्मक पातळीवरच टाकली जाते. पुरुषांच्या शिक्षणाकडं किंवा साक्षरतेकडं बौद्धिक आनंदाच्या दृष्टीनं बघू शकणारा समाज, स्त्रियांच्या साक्षरतेकडं केवळ उपयुक्ततावादी दृष्टिकोनातून पाहतो. साक्षरता मोहिमेचा हेतू जर समाजातल्या तळागाळातल्या लोकांच्या सक्षमीकरणाचा असेल तर निव्वळ कामचलाऊ साक्षरतेचे कार्यक्रम राबवून चालणार नाही. समाजातल्या बहिष्कृत घटकांना सत्तेत सहभागी करू घ्यायचं असेल, तर त्यांच्या साक्षरतेला, चिकित्सक विचारांची बैठक हवी. ती साक्षरता कार्यक्रमातून आणता येऊ शकते, पण प्रश्न आहे तो आपल्याला निरक्षरांना खरंच 'चिकित्सक साक्षर' बनवायचंय का हा! साक्षरता ही आजच्या समाजाची, समाजातल्या प्रत्येकाची गरज आहे. साक्षरतेमुळं निरक्षरांसाठी वेगळ्या प्रकारच्या ज्ञानाची कवाडं उघडतीलच, पण त्यांना साक्षर समाजाकडून होणाऱ्या फसवणुकीची जाणीवदेखील होईल; मात्र त्यासाठी साक्षरतेचे कार्यक्रम 'निरक्षरकेंदी' असायला हवेत, शासनकेंदी नाहीत. या कार्यक्रमांनी निरक्षरांच्या ज्ञानाचा, अनुभवांचा, परिसरांचा, संस्कृतीचा आदर बाळगायला हवा. पर्यावरणाची वाट लावल्यानंतर आता, 'आदिवासींची नैसगिर्क जीवनशैलीच जास्त योग्य आहे' हे सिद्ध करण्याच्या वाटेवर असणाऱ्या 'अतिप्रगत' समाजानं 'ज्ञानज्योती' कोण कुणाच्या दारात तेवत्या ठेवणार आहे याचं भान बाळगायला हवं. हे भान सुटू न देता साक्षरता कार्यक्रम आखले अन् राबवले गेले तरच निरक्षरतेची जागा चिकित्सक साक्षरता घेईल. www.marathisms.blogspot.com
Literacy day