SMS Category
Home
Shivrajabhishek (Jeshta Shuddha Trayodashi) information history जेष्ठ शुद्ध त्रयोदशी राज्याभिषेक दिन
आज जेष्ठ शुद्ध त्रयोदशी आजच्याच दिवशी आपलं राजं छत्रपती झालं राजे एका हातात बलदंड असा राजदंड अन् दुसर्या हातात भवानी तलवार पेलून सिंहाप्रमाणे धीमी, ऐटदार पावले टाकीत, आपली तीक्ष्ण तेजस्वी नजर चौफेर फिरवीत असतील, हलकेच पापण्या मिटून, अगदी नकळत अशा स्मिताने झडणार्या मुजर्यांचा स्विकार करीत असतील, अल्काबाचा प्रत्येक शब्द रायगडावर शहारे उठवीत असेल मराठ्यांचा पहिला राजपुत्र, ज्ञानकोविंद शंभुराजे आपल्या पित्याचे अनुकरण करीत दमदार पावले टाकीत सिंहासन जवळ करत असतील जिजाऊंच्या डोळ्यांतून तर आनंदाश्रू थांबत नसतील समाधानाने चेहरा ओत-प्रोत भरला असेल त्यांचा सोयरामाँसाहेब अखंडलक्ष्मीअलंकृत अशा वैभवलक्ष्मी महाराज्ञी शोभत असतील काही वेळात सिंहासनारुढ होऊ पाहणार्या ह्या माणसाला दर्याखोर्यातील काटक मावळे एकत्र करणार्या, निबिड अन् बेलाक अशा सह्याद्रीत गडकोट बांधणार्या, जिंकणार्या शिवबापासून, दिल्लीपती औरंगजेबाचा त्याच्याच दरबारात पाणउतारा करणार्या, कारतलबखान, फत्तेखान, शायिस्तेखान, अफजलखान, बहादुरखान अशा एकेक बलाढ्य योध्द्यांचे पारिपत्य करणार्या, रांझ्याच्या पाटलाचा चौरंगा करणार्या शिवाजी महाराजांपासून तो थेट बत्तीसमणी सिंहासानाचे चक्रवर्ती सम्राट होइपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज होईपर्यंत पाहणार्या लोकांचे शेले मुजरा घालताना आपसुक डोळ्यांशी गेले असतील आणि आठ सिंहांच्या सिंहासनावर एक मराठ्यांचा नरसिंह मुजोर परक्यांचे, ईंग्रज, डच, मोगल, आदिल, पोर्तुगालांचे मुजरे, कुर्निसात स्वीकारीत सिंहासानारुढ झाला असेल तोफेची भांडी अवघ्या पृथ्वीला दणाणून सांगत असतील "आमचं राजं छत्रपती झालं !!! आमचं राजं छत्रपती झालं !!! आमचं राजं छत्रपती झालं !!!" राज्याभिषेक दिन चिरायु होवो बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव www.marathisms.blogspot.com
Shivrajabhishek