SMS Category
Home
Guru Nanak Jayanti marathi sms message whatsapp status
शीख धर्माची स्थापना गुरू नानक यांनी सोळाव्या शतकात पंजाबमध्ये केली. जगभरात एकूण दोन कोटी शीख राहतात. त्यातील बहुतांश पंजाबमध्ये राहतात. ब्रिटनमध्येही जवळपास पाच लाख शीख वास्तव्य करतात. शीख हा जगातला पाचवा सर्वांत मोठा धर्म आहे. गुरू ग्रंथसाहिब हा शीखांचा धर्मग्रंथ आहे. शीखांचे एकूण दहा गुरू आहेत. त्यातील पहिले गुरू नानक. त्यांच्यानंतर नऊ गुरू झाले. दहावे गुरू गोविंदसिंग यांनी आपल्या अनुयायांना सांगितले की माझ्या मृत्यूनंतर गुरू ग्रंथ साहिबा यालाच आपले गुरू माना व त्यात सांगितल्याप्रमाणे आचरण करा. त्यामुळे पुढे गुरूंची परंपरा बंद झाली. शीख हा शब्द मुळ संस्कृतमधुन आला आहे. त्याचा अर्थ होतो शिष्य. शीख हे एकेश्वरवादी आहेत. ते देवाला 'वाहे गुरू' म्हणतात. तो अकाल व निरंकार आहे असे ते मानतात. धार्मिक कार्य करत बसण्यापेक्षा चांगले कृत्य करण्याला ते प्राधान्य देतात. शीख धर्माची शिकवण- देवाला हृदयात ठेवा प्रामाणिकपणे जगा व भरपूर कष्ट करा सर्वांशी समान वागा दुसरयांची सेवा करा दैवावर जास्त विश्वास ठेऊ नका. गुरू नानक जयंती दिनाच्या शुभेच्छा www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
shikh religion History kavita story katha poem sandesh message sms
information nibandh details mahiti msg
Guru Nanak Jayanti