SMS Category
Home
Makar Sankrati Mantra Will Complete Your wishes
मकरसंक्रांती : हे 7 उपाय दुर्भाग्याला बदलू शकतात सौभाग्यात 1- ज्यांच्या कुंडलीमध्ये सूर्य नीच स्थितित आहे. त्यांनी मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाचे मनापासून पूजन केल्याने पत्रिकेतील दोष नाहीसे होतात. सूर्य यंत्राची स्थापना अशा प्रकारे करावी. मकर संक्रांतीला पहाटे सकाळी लवकर उठावे. नित्य कर्म आटोपून घेतल्यानंतर स्नान करावे. त्यानंतर सूर्यदेवाला नमस्कार करावा. सूर्ययंत्राचा गंगाजल तसेच गायीच्या दूधाने अभिषेक करावा. यंत्राचे विधिपूर्वक पूजन केल्यानंतर सूर्य मंत्राचा जप करावा. मंत्र: ऊँ घृणि सूर्याय नम: जप झाल्यानंतर आपल्या देवघरात यंत्राची स्थापना करावी. हा विधी केल्यानंतर जीवनातील सर्वप्रकारच्या समस्या दूर होतील. 2- मकरसंक्रांतीला सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य द्या. त्यानंतर पूर्व दिशेला मुख करून रुद्राक्षाच्या माळेने खालील मंत्राचा कमीत कमी 5 माळ जप करा. मंत्र - ऊं आदित्याय विदमहे दिवाकराय धीमहि तन्नो सूर्य: प्रचोदयात् या मंत्राचा प्रत्येक रविवारी जप केल्यास लवकर शुभफळ प्राप्त होतात. 3- मकर संक्रांतीला सकाळी लवकर उठून सूर्यदेवाला तांब्याच्या कलशाने जल अर्पण करावे. सूर्याला अर्पण केल्या जाणार्या पाण्यात कुंकू तसेच लाल रंगाचे फूल टाकावे. सूर्याला जल अर्पण करताना 'ऊँ घृणि सूर्याय नम:' या मंत्राचा जप करावा. असे केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. 4- ज्योतिषशास्त्रानुसार तांब हा सूर्याचा धातु आहे. मकरसंक्रांतीला तांब्यांचे नाणे अथवा तांब्यांचा तुकडा वाहत्या पाण्यात प्रवाहित केल्याने जन्मपत्रिकेतील दोष नाहीसे होतात. याशिवाय लाल कपड्यामध्ये गहू आणि गुळ एकत्र बांधून दान केल्यास मनोकामना पूर्ण होतात. 5- तंत्रशास्त्रानुसार मकर संक्रांतीला गुळ आणि तांदूळ पाण्यात प्रवाहित करणे शुभ मानले जाते. सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी भात, गुळ आणि दूध प्रसाद म्हणून ग्रहण करावे. हा उपाय केल्याने शुभफळ मिळते. 6- मकर संक्रांतीला दान करण्याला विशेष महत्त्व असते. धर्मशास्त्रानुसार या शुभदिनी दान केल्याने पुण्य शंभर पटींनी वाढते. आपल्या यथाशक्तीप्रमाणे घोंगडी, गरम कपडे, तूप, डाळ-तांदूळ इ. दान करावे. दीनदुबळ्यांना भोजन दिल्याने मनोकामना पूर्ण होतात. 7- मकरसंक्रांतीला सकाळी लवकर उठून स्नानसंध्या झाल्यनंतर पूर्व दिशेला मूख करून बसावे. समोर लाकडी पाट ठेवावा. त्यावर शुभ्र वस्त्र पसरावे. त्यावर सूर्यदेवाची प्रतिमा अथवा सूर्य यंत्र ठेवावे. त्यानंतर सूर्यदेवाचे विधिपूर्वक पूजन करून गुळाचा नैवेद्य दाखवावा. लाल फूल अर्पण करावे. त्यानंतर लाल चंदनाच्या माळेन खाली दिलेल्या मंत्राचा जप करावा. मंत्र- ऊँ भास्कराय नम: www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
pooja vidhi tantra mantra information value
Makar sankranti