SMS Category
Home
shiv charitra powada
पुरोगामी छत्रपती (पोवाडा) – शाहीर आत्माराम पाटील हिंदवी स्वराज्याचा जनक । लोकनायक । राष्ट्रपाईक । छत्रपति शिवाजी महाराज ॥ जगत् युग पुरुषाचा ताज । महामानवी आत्मतेज ॥ तो सत्त्वगुणांचा चंद्र । जनीं राजेंद्र । रणीं महारुद्र । त्रिगुणसंपन्न तीव्रबुद्धी ॥ राजकर्तव्य दक्ष नृपती । जगांतिल महान् मुत्सद्दी ॥ चाल साम्राज्यशाहीचें प्रस्थ उभ्या अवनीत । आन् आदिलशाही मोगलाई देशांत । ह्या राहुकेतूंच्या जबरदस्त ग्रहणांत । हा भारताचा भास्कर । सह्याद्रीवर । खुले प्रखर । स्वराज्य नाथ ॥ चाल जमिनदारी जहागिरदारीला दिली मूठमाती । समता निर्मून समर सिद्धिला केली सैन्य भरती ॥ चाल पकडला मोहिते मामा । नात्याची धरली नाहीं तमा ॥ तो चंद्रराव सासरा । लावला त्याला कासरा ॥ सोडला नाहीं फितूर सगा सोयरा ॥ तो कठोर कर्तव्याचा होता मोहरा ॥ चाल घरभेदे शासिले घेतले जन विश्वासांत । जनता युग निर्माता शिवबा पहिला विश्वांत ॥ चाल ती सुभेदाराची सून । असहाय बंदिनी असून ॥ ते मुसमुसतें तारुण्य । तें रसरसतें लावण्य ॥ शिवनीति कराया हरण । मदनानें मारला बाण ॥ पण शिवराया नितिमान । मदनास आणले शरण ॥ चाल देऊनी वसनें अरिसुंदरीला मानियली माता । शत्रुच्याहि अब्रूचा रक्षक शिवराया होता ॥ चाल सैन्यांत होते रणवीर । ते सर्वं धर्माचे वीर ॥ तानाजी, बाजी झुंजार । नेताजी नि पासलकर । तसे होते आरमारावर । नेकीचे मराठे वीर ॥: इब्राहिम खान बहादुर । दौलतखान रणशूर ॥ आग्र्र्याच्या संकटावर । सुटकेची मात करणार । शिवबाला साथ देणार । ते राम रहीम मैतर । हिरोजी नि मदारी मेहेतर ॥ चाल स्वराज्य कामीं पणीं लाविले सर्व पंथ धर्म । महान राष्ट्रीयतेचा केला महाराष्ट्रधर्म ॥ चाल तो प्रतापगडचा खटका । पन्हाळी सटका । आग्र्याहून सुटका । शक्ति बुद्धि न् युक्तिवान ॥ दाखवी शिवबाची शान । विवेकी प्रसंग अवधान ॥ चाल तो दास होता संताचा...संताचा । हव्यास गुणी पंथाचा ॥ जी जी जी ॥ तो हरहर रणवंताचा....वीरांचा । तो ऋणी सदा शहीदांचा ॥जी जी जी ॥ गावया पवाडा त्याचा....अहो त्याचा । तो प्रेरक डफतंताचा ॥जी जी जी ॥ चाल वीर रसानें खडा कराया अवघा सह्यकडा । तानाजीच्या वीर-गतीचा वदवी पोवाडा ॥ चाल जयसिंग स्वारीचा बदला । सुरतेवर चढवी हल्ला ॥ नाडीलें नाहीं कोणाला । अन् सज्जन गुणवानाला । नाडीलें न महिलां बालां ॥ चाल दानशूर स्वर्गीय शेठ तो परीख मोहनलाल । कीर्ति ऐकुनी सुखी राखला विधवेचा महाल ॥ चाल कृष्णेची दौड तुफान । शत्रूचे उडवी भान ॥ ती बघतां खडग भवानी । शत्रूची दाणादाणी ॥ सिद्दीचा उतरे माज । शरणीले पोर्तुगीज ॥ इंग्रज राहिले चूप । पाहूनी शिव प्रताप ॥ दिल्लीला आला ताप । दुनियेची उडाली झोंप ॥ चाल सह्याद्रीच्या कडेकपारीं लढला शिवराया । हिमालयाच्या स्वातंत्र्याचा घडला मूळ पाया ॥ चाल श्रीछत्रपती शिवराय । हिंद सरताज । अवनीचा साज । आठवा शौर्य स्वरुप गुण ॥ आत्मारामाची तुम्हा आण । चालवा नवा हिन्दुस्थान ॥ www.marathisms.blogspot.com
marathisms.blogspot.com
Shivaji Maharaj