SMS Category
Home
World consumer day National consumer day speech in Marathi sms status slogan 15 march 24 december जागतिक ग्राहक दिन राष्ट्रीय ग्राहक दिन जागो ग्राहक जागो
15 मार्च हा दिवस दरवर्षी "जागतिक ग्राहक दिन' म्हणून साजरा केला जातो २४ डिसेंबर हा दिवस दरवर्षी भारतात 'राष्ट्रीय ग्राहक दिन' म्हणून साजरा केला जातो जागो ग्राहक जागो’ सारख्या जाहिराती अलीकडे आपण विविध प्रसारमाध्यमांतून वाचतो, ऐकतो. गिर्हाईकाला जागवण्याचे हे जे काम सार्या जगभर चाललेले आहे, त्याचे खरे श्रेय जाते अमेरिेकेेचे माजी अध्यक्ष जॉन कॅनेडी यांना, ज्यांनी १५ मार्च १९६२ या दिवशी ग्राहक हक्कांची अंमलबजावणी केली. त्यांच्या या कार्याची आठवण म्हणून १५ मार्च हा दिवस सार्या जगभर जागतिक ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय ग्राहक हक्क चळवळीमध्ये ऐक्यता व दृढता राखली जावी, हा त्यामागचा उद्देश असतो. २४ डिसेंबर १९८६ या वर्षी हा ग्राहक हक्क कायदा आपल्या देशामध्ये मंजूर केला गेला. म्हणून २४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. आता कस्टमर (ग्राहक) म्हणजे कष्ट करून करून जो मेला तो ग्राहक, अशी अवस्था झालेली आहे. जागतिकीकरणाच्या प्रभावानंतर ग्राहक प्रभावीपणे उभा राहू शकलेला नाही. 1986 मध्ये ग्राहक संरक्षण कायद्यात लागू झाला. मात्र, त्यातील तरतुदींच्या अंमलबजावणीला विलंब लागल्याने तो ग्राहकांपर्यंत पोचू शकला नाही. आज एखाद्या तक्रारीचा पाठपुरावा करण्यास आज ग्राहक कमी पडत आहे. ग्राहकाकडे संयम नाही, वाट पाहण्याची शक्ती नाही. एखाद्या वस्तूंच्या खरेदीनंतर बिलाबाबत संविधानातच तोकडी तरतूद आहे. एखाद्या वस्तूच्या बिलात व्हॅट कर आकारला जातो. त्या वेळी आपण व्हॅटसह बिल मागतो का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. काही वेळेस तर बिलात व्हॅटचा समावेश आहे किंवा नाही हेच समजत नाही. सोने खरेदीच्या वेळी काही ग्राहक बिल घेत नाहीत. येथे व्यापारी व ग्राहक यांच्यात संवाद होतो. प्रत्येक वेळी एक दिवस ग्राहक दिन पाळून उर्वरित दिवस ग्राहक संरक्षण कायदा पायदळी तुडवू नये, असे वाटते. ग्राहकांच्या जागृतीसाठी प्रबोधनाचा मार्ग महत्त्वाचा आहे. सगळेच प्रश्न कायद्याने सुटणार नाहीत. ग्राहक दिन हा केवळ उत्सव होईल. यातून शासकीय अधिकारी केवळ प्रबोधनाचे काम करतील. पानटपरीवाल्यापासून मोठ्या दुकानदारांपर्यंत फूड ऍण्ड ड्रग्जचा परवाना घेणे सक्तीचे झाले आहे. हा परवाना घेण्यासाठी धडपड करावी लागते. त्यामुळे सर्व जण चोऱ्या करतात. कायदा हा ग्राहकांसाठी, की अधिकाऱ्यांसाठी हे स्पष्ट होत नाही, तोपर्यंत ग्राहक कष्ट करूनच मरणार आहे. www.marathisms.blogspot.com
Consumer Day