SMS Category
Home
social awareness sms
★|| हि माहिती असू द्या || ★ घर कर्ज, वाहन कर्ज, बँकेत खाते खोलणे, अगदी नवीन सीम खरेदी करण्यासाठी .. बऱ्याच ठिकाणी आपण आपली KYC कागदपत्रे (आपली ओळख, निवासाचा पत्ता, .. पॅन कार्ड इत्यादी) वेगवेगळ्या लोकांकडे संस्थांकडे सादर करीत असतो .. सर्वच ठिकाणी आपल्याला सेल्फ सर्टीफिकेशन (कागदपत्रांवर आपल्याला सही करायची असते) .. आपण लगेच अश्या कागदपत्रांवर सहज सही करतो आणि आपली कागदपत्रे सादर करतो आता विचार करा कि आपली हि कागदपत्रे (सेल्फ सर्टिफाइड केलेली) सहजरीत्या ज्याच्याकडे आपण ती सादर करतो त्या व्यक्तीच्या हाती उपलब्ध असतात .. ज्याचा वापर ती व्यक्ती किंवा त्या संस्थेतील कुणी गुन्हेगारी प्रवृत्तीची व्यक्ती कोणत्याही इतर कारणासाठी सहज करू शकते हि गंभीर बाब आहे .. असे आढळून आले आहे कि दहशतवादी हल्ल्यात किंवा बऱ्याचशा गुन्ह्यात बहुतेक वेळा अश्या कागदपत्रांचा उपयोग सीम कार्ड खरेदी करण्यासाठी झालेला आहे ★ तेव्हा, कृपया एक सवय लावून घ्या . . तुम्ही जेव्हा कोणत्याही कारणासाठी आपली कागदपत्रे (सेल्फ सर्टिफाइड) कुणाकडे देता, त्यावेळेस त्या प्रत्येक कागदपत्रावर तुम्ही सही केल्यावर तारीख आणि तुम्ही ज्या कारणासाठी ती कागदपत्रे देत आहात त्याचे कारण स्पष्ट शब्दात लिहिण्याची सवय लावा जेणेकरून, तुमची कागदपत्रे इतर दुसऱ्या कोणत्याच कारणासाठी वापरणे शक्य होणार नाही उदा. आपण आपली कागदपत्रे जर एखादे वाहन खरेदी करण्यासाठी कर्ज काढण्यासाठी जर देत असाल तर त्यावर .. तुमच्या सही खाली दिनांक .. त्याखाली .. सदर कागदपत्र केवळ अमुक अमुक वाहन कर्ज काढण्यासाठी देत आहे .. असे लिहून त्या भोवती सर्कल करा असे प्रत्येक कागदपत्रावर करा .. थोडा वेळ जाईल पण, त्यामुळे तुमची कागदपत्रे कुणीच दुसऱ्या कारणासाठी वापरू शकणार नाही हि बाब तशी छोटीशी आहे .. पण, ती तुम्हाला अडचणीत येण्यापासून वाचवू शकेल कुणी गुन्हेगारी प्रवृत्तीची व्यक्ती त्याचा वापर करू शकणार नाही ★ || पटत असल्यास इतरांना सुद्धा सावध करा || धन्यवाद || www.marathisms.blogspot.com
Social sms