SMS Category
Home
मराठी देव Marathi god list
अंचलेश्वर (चंद्रपूर) - अंचलेश्वर मंदिराची माहिती - [१] अमृतेश्वर (रतनवाडी-अहमदनगर जिल्हा. याशिवाय कर्नाटकात) उत्तरेश्वर (या देवाची देवळे आलेगाव, उत्तरेश्वरपिंप्री, कोल्हापूर, जुन्नर, तेर आदी गावांत आहेत.) ओंकारेश्वर (पुणे शहरातले प्रसिद्ध देऊळ. याहून प्रसिद्ध असलेले देऊळ मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यात ओंकारेश्वर गावात आहे.) कनकेश्वर (फोफेरी-अलिबाग(कुलाबा जिल्हा) कपर्दिकेश्वर (ओतूर, जुन्नर तालुका-पुणे जिल्हा) कपिलेश्वर (केळवद, सावनेर तालुका-नागपूर जिल्हा. कपिलेश्वराची आणखी मंदिरे छत्तीसगड राज्यात आहेत.) काळभैरव (शिवाचे एक रूप. उणेगाव, देवघर-श्रीवर्धन तालुका-नाशिक, पंढरपूर वगैरे वगैरे.) काळभैरवनाथ (मावळ तालुक्याचे आराध्यदैवत आणि वडगाव गावाचे ग्रामदैवत). पिंपरी (पुणे) गावातही काळभैरवनाथाचे एक देऊळ आहे. कुणकेश्वर (देवगड तालुका-सिंधुदुर्ग जिल्हा) खंडोबा (याचे देऊळ जेजुरीत आहे) खैसोबा (याचे देऊळ जेजुरीत आहे) गजाननमहाराज (या देवाची देवळे अनेक गावात आहेत. आद्य आणि मुख्य देऊळ शेगाव येथे आहे.) गिरोबा (सिंधुदुर्ग जिल्ह्यात : मोचेमाड-वेंगुर्ले तालुका, सांगेली-सावंतवाडी तालुका, भडगाव बुद्रुक-कुडाळ तालुका वगैरे) गौतमेश्वर (चिपळूण. शिवाय राजस्थानात) घृष्णेश्वर - (शिवाचे एक रूप.-औरंगाबादजवळ वेरुळ येथे मुख्य मंदिर आहे.) घोरावडेश्वर (पुणे जिल्ह्यातील देहूरोड, तळेगाव गावांच्या दरम्यानच्या टेकडीवर हे देऊळ आहे.) जिव्हेश्वर (साळी समाजाचे दैवत. या देवाचे देऊळ पैठणला आहे.) जीवनेश्वर (या देवाचे मंदिर कुलाबा जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे आहे.) ज्योतिबा चेतोबा (दगडाला शेंदूर फासून हा देव कुणालाही बनवता येतो.) झुलेलाल (सिंधी देव)- या देवाची पुण्याजवळच्या पिंपरीत आणि मुंबईजवळच्या उल्हासनगरमध्ये देवळे आहेत.साधारणत: जेथे सिंधी समाजाची वसती आहे तेथे हा देव असतो. हिंदूच्या जलदेवतेशी(वरुण) साधर्म्य साधणारी ही देवता आहे. जेको चवन्दो झुलेलाल, तहिंजा थिंदा बेडा पार.(जो झुलेलाल म्हणतो(जपतो), त्याचा बेडा पार होतो.)[२] डोळसनाथ (तळेगाव स्टेशन भागात-पुणे जिल्हा) तेलंगराय बाबा (सारंगपुरी,वर्धा जिल्हा) त्रिविक्रम (या देवाची मंदिरे तेर, शेंदुर्णी आदी गावात आहेत.) त्र्यंबकेश्वर दत्त दरीदेव दैत्यसूदन, लोणार (बुलढाणा जिल्हा) धनेश्वर (चिंचवडगाव-पुणे) धूतपापेश्वर (राजापूर-रत्नागिरी) नागनाथ नागेश्वर पंढरीनाथ पल्लीनाथ पांडुरंग पाताळेश्वर-मूलतः, एक शिव मंदिर.नागपूरच्या महाल भागात याचे एक मंदिर आहे.[३] पिंगळभैरव पोटोबा महाराज (वडगाव-मावळ येथील देवस्थान) बाळकृष्ण बिरदेव बिरोबा (मूळचा वीरभद्र). हा धनगर समाजाचा देव आहे. याची देवळे आरेवाडी (तालुका कवठेमहांकाळ), वडवणी (बीड जिल्हा), मिरी (तालुका पाथर्डी) वगैरे गावांत आहेत. बोल्हाई (या देवीचे देऊळ पिंपरी सांडस गावाजवळ आहे). भद्रेश्वर (वाई) भानोबा (कुसेगाव, तालुका दौंड-पुणे जिल्हा) भुलेश्वर भैरवनाथ (आगडगाव-अहमदनगर जिल्हा; आंबेगव्हाण-जुन्नर तालुका; सिन्नर-नाशिक जिल्हा; खडकवासला-पुणे) मल्लारीखंडोबा मल्लारीमार्तंड मारुती : ह्या देवाला महाराष्ट्राबाहेर हनुमान म्हणूनच ओळखले जाते. मारुती हा खास मराठी देव आहे. मार्तंडभैरव मुंजाबा ( मुंजोबा ?) : या देवाची देवळे खराडी (पुणे-नगर रस्ता), खारवडे (मुळशी, पुणे), थेऊर, वगैरे गावी आहेत. जेजुरीत ७ देवळे आहेत. म्हसोबा : या देवाची देवळे खारवडे, मुळशी तालुका, पुणे शहर ....वगैरे ठिकाणी आहेत. जेजुरीला ओकाऱ्या म्हसोबा, नकट्या म्हसोबा आदी ५ म्हसोबा आहेत. साधारणतः रस्त्यास असलेल्या घाटात(डोंगर चढाय-उतरायला केलेला वळणावळणाचा रस्ता)याची देवळे असतात. वाहनचालक घाटात त्यांच्या वाहनाला अपघात होऊ नये म्हणून याची घाटात शिरतेवेळी/निघाल्यावर पूजा करतात. म्हसोबाला पत्नी नाही. त्यावरून मराठीत ’म्हसोबाला बायको नाही आणि सटवाईला नवरा!’ अशी म्हण आहे. हा खास मराठी देव आहे. म्हातोबा (कोथरूडचे ग्रामदैवत असलेल्या या देवाचे स्थान पुण्यातील कोथरूडच्या म्हातोबा गडावर आहे.) म्हादोबा म्हाळसाकांत रवळनाथ : मुख्यत्वे कोकणात - निरुखे गाव-कुडाळ तालुका; पणजी-गोवा; सातार्डे-सावंतवाडी तालुका; एडगाव (वैभववाडी), वगैरे. अधिक माहिती पु.रा. बेहेरे यांच्या ’श्री रवळनाथ आणि कोकणातील देवस्की’ या पुस्तकात. रायरेश्वर रूपनारायण रोकडोबा (शिरगाव-मावळ गावाचे ग्रामदैवत वटेश्वर वाकेश्वर (वाई) वाळकेश्वर : या देवाची मंदिरे अनेक गावांत आहेत. आलेगाव, दटषिवा मुबई, पातुर, बांद्रा, वगैरे. विठ्ठल वीरभद्र वेताळबाबा : याची देवळे पुणे, फलटण, राजापूर (सातारा जिल्हा), संगमनेर (अहमदनगर जिल्हा), सातपूर (नाशिक जिल्हा) आदी गावांत आहेत. हा भुतांचा राजा आहे. वेताळेश्वर (तळेगाव दाभाडे) वेतोबा व्याघ्रेश्वर शकुंतेश्वर (वडुथ-सातारा जिल्हा) शंभूमहादेव (शनिशिंगणापूर) (हजरत गारपीर) शहावली बाबा (तळेगाव दाभाडे खिंड) श्रीमाऊली साईनाथ (साईबाबा या नावाने अधिक परिचित) सिद्धिविनायक सिद्धेश्वर (मांडवगण-अहमदनगर जिल्हा; सोलापूर) सुवर्णेश्वर सोमेश्वर हजरत गफूरशाह हुसैनी कलंदर (पुण्यातील दारूवाला पुलावरचा पीर) हजरत मोहंमदशाह हुसैनी (पुण्यातील दारूवाला पुलावरचा दुसरा पीर) हरिहरेश्वर (कुलाबा जिल्हा) www.marathisms.blogspot.com
God name